Agriculture Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Agrotech Inauguration : मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत अकोल्यात ‘ॲग्रोटेक’चे उद्या उद्‍घाटन

State-Level Agricultural Exhibition Agrotech : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारपासून (ता. २७) येथे कृषी विद्यापीठाच्या मैदानावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ‘ॲग्रोटेक’ आयोजित करण्यात आला आहे.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारपासून (ता. २७) येथे कृषी विद्यापीठाच्या मैदानावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ‘ॲग्रोटेक’ आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. या वेळी अध्यक्षस्थानी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे राहणार आहेत.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे आयोजित या कृषी प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहील.

याशिवाय जिल्हा अध्यक्षा संगीता अढाऊ, खासदार अनुप धोत्रे, तुषार पवार, कृषी सचिव जयश्री भोज, कुलगुरू पंदेकृविचे डॉ. शरद गडाख, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांचीही उपस्थिती राहील.

दररोज मंत्र्यांची वर्दळ

यावर्षी कृषी प्रदर्शनात दररोज मंत्र्यांची मांदियाळी असणार आहे. उद्‍घाटनाला पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, एक उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री उपस्थित राहतील. दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. २८) निरोगी आरोग्य आणि शेती या विषयावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थिती कार्यक्रम होईल. तर शेवटच्या दिवशी रविवारी (ता. २९) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

चर्चासत्रांचे नियोजन

कृषी प्रदर्शनात दररोज विविध विषयांवर चर्चासत्रे ठेवण्यात आली आहेत. पीक उत्पादनापासून प्रक्रिया, मार्केटिंग, ब्रँडिंग, निर्यात अशा विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय, कृषी तंत्रज्ञान यंत्रणा (आत्मा) तसेच कृषी विभागाच्या पुढाकाराने हे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT