Agristack Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Agristack Yojana : विविध योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक

Farmer ID : शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ॲग्रिस्टॅक म्हणजे शेतकरी ओळखपत्र आवश्यक ठरणार आहे.

Team Agrowon

Nanded News : शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ॲग्रिस्टॅक म्हणजे शेतकरी ओळखपत्र आवश्यक ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी हे ओळखपत्र आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. नऊ) मुदखेड तालुक्यातील निवघा आणि डोंगरगाव या दोन गावांना भेट देऊन ॲग्रिस्टॅक प्रकल्पाबाबत नोंदणी प्रक्रियेची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी सर्व शेतकऱ्यांनी स्वतःचा फार्मर आयडी काढून घ्यावा असे, आवाहन केले.

शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी ‘ॲग्रिस्टॅक’ म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषिविषयक सेवा, सुविधा तसेच शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील. यासाठी ‘ॲग्रिस्टॅक’ नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.

याची नोंदणी प्रत्येक महा ई-सेवा केंद्रावर सुरू असून ‘ॲग्रिस्टॅक’ उपक्रमाची गावस्तरावर मोहीम राबवून सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होण्यासाठी हा उपक्रम प्रशासनाकडून प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे.

यामध्ये गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, महसूल सेवक, पोलिस पाटील, रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, रास्तभाव दुकानदार तसेच सरपंच, गावातील प्रतिष्ठीत नागरिक व सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. सीएससी केंद्र चालकांना ॲग्रिस्टॅक आज्ञावली वापराचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचा योग्य वापर झाला पाहिजे असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT