PDKV Akola  Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Agriculture : शेतीला अनन्यसाधारण महत्त्व येणार ः डॉ. चौधरी

Latest Agriculture News : वाढती लोकसंख्या लक्षात घेता येणाऱ्या भविष्यात शेती क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल.

Gopal Hage

Akola News : ‘‘वाढती लोकसंख्या लक्षात घेता येणाऱ्या भविष्यात शेती क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल. पर्यायाने कृषी विद्यापीठांची व्याप्ती अधिकच वाढेल,’’ असे मत भारतीय कृषी अनुसंधान परिषद (नवी दिल्ली)चे उपमहासंचालक डॉ. सुरेशकुमार चौधरी यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ५५ व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी (ता. २०) आयोजित कार्यक्रमात डॉ. चौधरी मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते.

डॉ. चौधरी म्हणाले, ‘‘कृषी शिक्षण, कृषी संशोधनासह कृषी विस्तार कार्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक अग्रेसर होत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संशोधनासाठी इतर विद्यापीठांनी अवलंबिलेले तंत्रज्ञान व प्रयोग आपल्याकडेही रुजविणे गरजेचे आहे. कृषिचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शेतीतच आपले व्यावसायिक करिअर करण्यासाठी अनेक संधी आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

युवा पिढीने अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करीत शेतीकडे वळावे. देशांतर्गत कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठांचे मध्यवर्ती केंद्र असून त्यांद्वारे प्रत्येक जिल्ह्यात कृषीविषयक तंत्रज्ञान प्रसारासाठी सहकार्य होत आहे. केव्हीके कृषी शास्त्राचा आरसा आहे.’’

डॉ. गडाख म्हणाले, ‘‘येत्या काळात विद्यापीठाला देशभरातील अग्रगण्य दहा कृषी विद्यापीठांत स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कौशल्य प्राप्त कृषी पदवीधर निर्मिती साध्य करण्यामध्ये सर्वार्थाने प्रयत्नशील आहेत.’’

सर्वोत्कृष्ट कार्यासाठी गौरव

कृषी महाविद्यालय (नागपूर), कृषी तंत्र विद्यालय (बुलडाणा) व कृषी तंत्र विद्यालय (शेलसुरा, जि. वर्धा), प्रादेशिक संशोधन केंद्र (अमरावती), कृषी विज्ञान केंद्र (सोनापूर, जि. गडचिरोली) यांना या वेळी उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आले. वैयक्तिक पुरस्कारांतअखिल भारतीय समन्वित कृषी संशोधन प्रकल्प फळपिके विभागाचे प्रा. डॉ. योगेश इंगळे यांना उत्कृष्ट संशोधन शास्त्रज्ञ पुरस्कार, बुलडाणा ‘केव्हीके’चे विषयतज्ञ प्रशांत देशपांडे यांना उत्कृष्ट विस्तार संशोधक पुरस्कार आणि अमरावती ‘केव्हीके’चे प्रा. हेमंत डिके यांना उत्कृष्ट प्रक्षेत्र व्यवस्थापक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT