Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Linking : बनावट ग्राहकांद्वारे शोधणार खतांची लिंकिंग

Seed Fertilizer Scam : खरीप हंगामाच्या काळात शेतकऱ्यांना जादा दराने बियाणे, खतांची विक्री, खताचे लिंकिंग शोधण्यासाठी कृषी विभाग बनावट ग्राहकांची मदत घेणार आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : खरीप हंगामाच्या काळात शेतकऱ्यांना जादा दराने बियाणे, खतांची विक्री, खताचे लिंकिंग शोधण्यासाठी कृषी विभाग बनावट ग्राहकांची मदत घेणार आहे. जिल्हास्तरावर केलेले भरारी पथकही अधिक सक्रिय राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यंदा तरी शेतकऱ्यांची होणारी लूट थांबेल, अशी आशा उंचावली आहे.

खरीप हंगामाच्या काळात खते, बियाण्यांची मागणी होते. त्याच काळात विक्रेते बियाणांची जादा दराने विक्री, बनावट बियाणे विक्री, खताची लिंकिंग करून अनावश्यक खतांची विक्री, खते, बियाण्यांचा साठा करून कृत्रिम टंचाई करण्याचे प्रकार घडतात. या काळात बियाणे, खताचे मुख्य विक्रेते त्यात सहभागी होत असल्याने किरकोळ विक्रेत्यांचा नाइलाज होत असल्याची बाब सातत्याने उघड झाली आहे.

अनेक वेळा मुख्य व किरकोळ विक्रेते यांच्यात तणावाची परिस्थितीही झालेली आहे. शेतकऱ्यांनी जादा दराने खरेदी, खताची लिंकिंग थांबविण्याची व कारवाई करण्यासाठी दरवर्षीच कृषी विभाग भरारी पथके करते, मात्र प्रत्यक्षात तक्रार नसल्याचे कारण पुढे करत कारवाई होत नाही हा आतापर्यंतचा अनुभव आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना पुरेसे बियाणे, खते उपलब्ध व्हावेत, तसेच बियाणे आणि खतांचा काळाबाजार थांबविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने जिल्हा आणि तालुका पातळीवर भरारी पथके तयार करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर असणाऱ्या या भरारी पथकात ८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. खरिपात खत आणि बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे.

या भरारी पथकाची कामे निश्‍चित करण्यात आली असून, त्यांनी हंगामाच्या निर्धारित वेळेत बियाणे व खते वितरक उत्पादक-विक्रेते केंद्रांना भेटी देऊन व्यापक स्वरूपात तपासणी मोहीम राबवावी. नियमबाह्य असणाऱ्या केंद्रांना विक्री बंदीचे आदेश काढावे. कालबाह्य बियाणे यांची तपासणी करून कारवाई करणार आहेत. शेतकऱ्यांना विक्री होणारे खते, बियाणे याची विक्री केंद्रातील बिले, शिल्लक साठा यातील तफावत असणाऱ्या केंद्रांवर कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक बियाणे लॉटचा नमुना घेऊन त्याची तपासणी करावी, अप्रमाणित बोगस अनधिकृत साठ्यांचा शोध घेऊन, त्यावर जप्तीची कारवाई करावी.

जिल्हास्तरावरील भरारी पथक

भरारी पथक प्रमुथ ः सुधीर शिंदे (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद)

सदस्य ः पी. बी. गोसावी (उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर), व्ही. आर. गायकवाड (उपविभागीय अधिकारी संगमनेर) डी. पी. डमाळे, (उपविभागीय कृषी अधिकारी अहिल्यानगर) आर. बी. सुपेकर (उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत), अमृत गांगडे (जिल्हा मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद) के. ए. दराडे (वजनमापे निरीक्षक) आर. बी. ढगे (जिल्हा गुणनियंत्रक).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : संपूर्ण कर्जमाफी, ऊसाला ४ हजार ५०० रुपयांचा दर, धानाला ३ हजार ५०० हमीभाव, महिलांना दरमहा २ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन; अभिनेते विजय यांच्या पक्षाचा जाहीरनामा

Orchard Farmers Support: फळबाग उत्पादकांना आर्थिक आधार

Krishi Seva Kendra: सतरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Onion Storage Tips: कांदा साठवताना होणाऱ्या चुका टाळा, नुकसान वाचवा

Rural Roads Survey: ग्रामपंचायतीच्या मालकीच्या रस्त्यांच्या सर्वेक्षणाचा निर्णय

SCROLL FOR NEXT