Agriculture University Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture University Contribution: संत्रा उत्पादकता वाढीत कृषी विद्यापीठाचे योगदान

Farming Technology: संत्रा पिकात इंडो-इस्राईल तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब करण्याच्या माध्यमातून विदर्भात संत्रा उत्पादकता वाढीचा उद्देश साधता आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अकोला कृषी विद्यापीठाच्या या तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार आणि अवलंब होण्याची गरज असल्याचे मत इस्रायली दूतावासातील समन्वयक ब्रम्ह देव यांनी व्यक्‍त केले.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News: संत्रा पिकात इंडो-इस्राईल तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब करण्याच्या माध्यमातून विदर्भात संत्रा उत्पादकता वाढीचा उद्देश साधता आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अकोला कृषी विद्यापीठाच्या या तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार आणि अवलंब होण्याची गरज असल्याचे मत इस्रायली दूतावासातील समन्वयक ब्रम्ह देव यांनी व्यक्‍त केले.

भारतनगरस्थीत सेंटर ऑफ एक्‍सलेंसमध्ये नुकत्याच आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. भारत आणि इस्राईल यांच्या संयुक्‍त सहकार्याने संत्रा पिकाकरिता सेंटर ऑफ एक्‍सलंस प्रकल्प राबविला जात आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संनियंत्रणात याची अंमलबजावणी केली जात असून अनेक प्रकारचे तंत्रज्ञान संत्रा बागायतदारांकरिता उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

त्यातून उत्पादकता वाढीस लागली आहे. त्याची दखल घेत हे तंत्रज्ञान लिंबूवर्गीय पीक घेणाऱ्या इतर राज्यांमध्ये प्रसारित व्हावे याकरिता कृषी विभागाच्या अधिनस्थ उद्यानविद्या अधिकाऱ्यांकरिता ही कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.

शाखीय वाढ (कॅनॉपी) व्यवस्थापन, दहा राज्यांतील उद्यानविद्या विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश होता. कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, डॉ. देवानंद पंचभाई, डॉ. प्रकाश कडू, डॉ. विलास अतकरे, संत्रा गुणवत्ता केंद्र प्रकल्प प्रमुख डॉ. विनोद राऊत, मिलिंद शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी पल्लवी देवरे यांची उपस्थिती होती.

हरित पाने असलेल्या झाडांना उन्हाची गरज नाही, असे सांगितले जात होते. परंतु आता अभ्यासाअंती संत्रा बागेत छाटणी (प्रुनींग) आवश्‍यक आहे, असे निष्कर्ष समोर आले आहेत. शास्त्रशुद्ध छाटणी तंत्रज्ञान त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने विकसित केले आहे. जुन्या फांद्याची काढणी केल्यास नव्या फांद्या येतात आणि त्यावर फुलधारणा अधिक होते. यासह इतर तंत्रज्ञानाबाबत कार्यशाळेतून माहिती दिली जात आहे.
डॉ. विनोद राऊत, प्रकल्प प्रमुख, सेंटर ऑफ एक्‍सलंस (ऑरेंज), नागपूर

दहा राज्यांतील अधिकारी

महाराष्ट्र, मिझोराम, हिमाचल प्रदेश, केरळ, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, त्रिपुरा या दहा राज्यातील ३५ उद्यानविद्या अधिकारी या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT