Agricultural Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Festival : तीन वर्षांनंतर जिल्ह्यात होणार कृषी महोत्सव

कृषी महोत्सवाची तारीख, ठिकाण लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांना जोडून ५ दिवसांचा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

Team Agrowon

सिंधुदुर्गनगरी ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (Agricultural Technology Management) यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात पाच दिवसांचा कृषी महोत्सव (Agricultural Festival) आयोजित करण्यात येणार असून या महोत्सवात २०० हून अधिक स्टॉल असणार आहेत. तारीख आणि ठिकाण लवकरच निश्चित होईल, अशी माहीती जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय दिवेकर यांनी येथे दिली.

जिल्हा कृषी विभागाच्या वतीने बैठकीचे आयोजन जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात करण्यात आले होते.

या बैठकीला दिवेकर, सहायक संशोधन संचालक डॉ. ए. जी. माटीलकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यस्थापक श्रीपाद दामले, फलोत्पादन शेतकरी संदीप देसाई, शेतकरी प्रतिनिधी बाजीराव झेंडे, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी नीलेश तेंडोलकर, शेतकरी महिला प्रतिनिधी रंजना कदम, विभागीय कृषी अधिकारी ए. जी. अडसुळे, पी. बी. ओहोळ, तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर, हर्षा गुंड, अश्विनी धारकर आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर दिवेकर म्हणाले, की कोरोनाच्या संकटामुळे मागील तीन वर्षांत जिल्ह्यात कृषी प्रदर्शन भरविता आले नाही.

परंतु आता कोरोनाचे संकट टळले आहे. त्यामुळे यावर्षी कृषी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. कृषी प्रदर्शनाच्या अनुषंगाने पूर्वबैठक घेण्यात आली.

कृषी महोत्सवाची तारीख, ठिकाण लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांना जोडून ५ दिवसांचा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

यामध्ये कृषी प्रदर्शन, परिसंवाद, चर्चासत्रे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्र, विक्रेता संमेलन, शेतकरी सन्मान समारंभ याचा समावेश असणार आहे. एकूण दोनशे स्टॉल यामध्ये असणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan Distribution: परभणी जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण

Office Assets Seized: अकलूज प्रांताधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त

Livestock Summer Impact: उष्णतेचा पशुधनालाही फटका

Rural Water Crisis: रायगडाच्या पायथ्याशी जलसंकट

China Urea Prodcuation: चीनमध्ये युरियासाठी कोळशाचा वापर का केला जातो?

SCROLL FOR NEXT