Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : थेट आयुक्तांकडूनच कृषी सहायक निलंबित

Agriculture Commissioner : शेतकऱ्यांना महिनोन् महिने न भेटणाऱ्या कृषी सहायक चक्‍क कृषी आयुक्‍तांच्या दौऱ्यातही अनुपस्थित राहिला.

Team Agrowon

Amravati News : शेतकऱ्यांना महिनोन् महिने न भेटणाऱ्या कृषी सहायक चक्‍क कृषी आयुक्‍तांच्या दौऱ्यातही अनुपस्थित राहिला. ही बाब गांभीर्याने घेत बारगावच्या या कृषी सहायकाच्या थेट निलंबनाचे आदेशच कृषी आयुक्‍तांना काढावे लागले.

वरुड तालुक्‍यातील बारगाव, जामगाव, खडका, पांढरघाटी, आंबाफाटा यांसह सात गावांची जबाबदारी विजय एम. गावंडे या कृषी सहायकाकडे आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नी ही कृषी पर्यवेक्षक पदावर याच तालुक्‍यात कार्यरत आहे.

परंतु विजय गावंडे हे स्थानिक असल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावात आपली जबाबदारीच पार पाडत नव्हते, अशा विभागांतर्गत आणि शेतकऱ्यांच्याही तक्रारी होत्या. त्यामुळे कृषी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला देखील खीळ बसली होती.

दरम्यान, शुक्रवारी (ता. २२) कृषी आयुक्‍त प्रवीण गेडाम हे या भागात दौऱ्यावर होते. विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांची दौऱ्यात उपस्थित होती. बारगाव येथे गेल्यानंतर स्थानिक कृषी सहायक मात्र अनुपस्थित असल्याची बाब कृषी आयुक्‍तांना खटकली.

अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता काहींनी ते चहा घेण्यासाठी गेल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्यांनी ते आधीच गावाकडे फिरकत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे ते आजही अनुपस्थित असतील हे आयुक्‍तांच्या तत्काळ लक्षात आले. त्यामुळे त्यांनी विजय गावंडे यांच्या तत्काळ निलंबनाचे आदेश काढले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT