Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Advisory : कृषी सल्ला (कोकण विभाग)

Weather Update : २२ ते २६ जून दरम्यान, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Team Agrowon

हवामान अंदाज

Indian Agriculture : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, २२ ते २६ जून दरम्यान, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

पुढील पाच दिवसांत कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान असेल तर किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत असेल. विस्तारीत श्रेणी अंदाजानुसार, कोकण विभागात ता. २६ जून ते २ जुलै, २०२४ दरम्यान कमाल तापमान आणि किमान तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

खरीप भात

रोपवाटिका

कोकणातील बहुतांश सर्व जिल्ह्यांतील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये भात रोपवाटिकेतील अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी. जोरदार पावसामध्ये खते वाहून जाण्याची शक्यता असल्यामुळे भात रोपवाटिकेत युरिया खताची दुसरी मात्रा देण्याचे काम पुढे ढकलावे.

नागली, वरई

रोपवाटिका पेरणी

नागली. वरई रोपवाटिकेतील पेरणीची कामे अपूर्ण राहिली असल्यास पूर्ण करून घ्यावीत. रोपवाटिका तयार करतानाच अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.

नागली, वरी पीक रोपवाटिकेसाठी जमिनीचा उतार लक्षात घेऊन, उंच निचऱ्याच्या जागी तळाशी १२० सें.मी. व पृष्ठभागी ९० सें.मी. रुंदीचे, ८ ते १० सें. मी. उंचीचे उतारानुसार योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करावेत. एक एकर क्षेत्रावरील लागवडीसाठी ४ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका पुरेशी होते. गादीवाफ्यावर प्रती गुंठा क्षेत्रास १ किलो युरिया खताची मात्रा द्यावी. वाफ्यावर दोन ओळींतील अंतर १० सें.मी. ठेवून बी ओळीत पेरावे. पेरणी विरळ व उथळ करावी. बी मातीने झाकून घ्यावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम २.५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात प्रक्रिया करावी.

भाजीपाला

जिल्ह्यातील तुरळक भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन रोपवाटिकेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.

वेलवर्गीय भाजीपाला

वाढीची अवस्था

पडवळ, कारली, दुधी भोपळा, शिराळी पिके वेल टाकू लागल्यावर त्यांना शिऱ्या लावून आधार द्यावा. मंडपाची व्यवस्था करावी.

वेलवर्गीय भाजीपाला

पिकातून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था

करावी.

डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१

(नोडल ऑफिसर, कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मोसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT