Crop Advisory Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory : कृषी सल्ला : राहुरी विभाग

Crop Management : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश काही ठिकाणी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Agriculture Update :

हवामान सारांश

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश काही ठिकाणी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

मका

काढणी व साठवणूक

परिपक्व झालेल्या खरीप मका पिकाची कापणी पूर्ण करून घ्यावी. कणसे पिवळसर, दाणे कडक झाल्यानंतर कणसे खुडून काढावीत.

कणसे दोन ते तीन दिवस उन्हात चांगली वाळवावीत. त्यानंतर कणसाच्या वरील आवरण काढून मका सोलणी यंत्राच्या साह्याने दाणे वेगळे करावेत. दाण्यांतील पांढरी तुसे, बिट्ट्याचे तुकडे वेगळे करण्यासाठी उफनणी करावी. दाणे चांगले उन्हात वाळवून दाण्यांतील आर्द्रता १२ टक्क्यांपर्यंत आल्यानंतर साठवण करावी.

कापूस

वेचणी

पिकातील २० ते ३० टक्के बोंडे फुटल्यानंतर पहिली वेचणी करून घ्यावी. त्यानंतर १५ ते २० दिवसांच्या अंतराने अनुक्रमे दुसरी व तिसरी वेचणी करावी.

कापूस वेचणी आटोपल्यानंतर सर्व पऱ्हाट्या उपटून शेताबाहेर न्याव्यात. या पऱ्हाट्यांचा वापर कंपोस्ट खत तयार करण्यासाठी करता येतो. या माध्यमातून किडींच्या सुप्त अवस्था नष्ट होतील.

बाजरी

काढणी व साठवणूक

परिपक्व झालेल्या बाजरी पिकाची सकाळच्या वेळी काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

सूर्यफूल

काढणी व साठवणूक

सूर्यफूल पीक परिपक्व झाले असल्यास काढणी करून मळणी करावी. धान्य स्वच्छ करून उन्हात वाळवून कोरड्या जागी साठवणूक करावी.

सोयाबीन

काढणी व साठवणूक

सोयाबीन पिकाची काढणी करून काडाचे छोटे-छोटे ढीग करून प्रखर सूर्यप्रकाशामध्ये शेतातच वाळवावे. त्यानंतर प्रादुर्भाव किंवा उगवण झालेल्या शेंगा वेगळ्या काढून त्यांची मळणी करून घ्यावी.

भुईमूग

काढणी व साठवणूक

पीक काढणीच्या वेळी झाडे उपटल्यानंतर शेंगाची ताबडतोब तोडणी करावी. साधारणत: ४ ते ५ दिवस शेंगा उन्हामध्ये वाळण्यास ठेवाव्यात. जेणेकरून शेंगामधील ओलावा ८ ते १० टक्क्यांपर्यंत येईल.

भाजीपाला पिके

पेरणी

रब्बी हंगामात भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी नियोजन करताना कंदवर्गीय भाज्यांमध्ये (मुळा, गाजर, बीट), पालेवर्गीय भाज्यांमध्ये (आंबट चुका, पालक, मेथी, शेपू, पोकळा) आणि फळवर्गीय भाज्यांमध्ये (वांगे, मिरची, टोमॅटो, वाटाणा, भेंडी, ढेमसा) या विविध प्रकारच्या भाज्यांची निवड करावी.

०२४२६ -२४३२३९

(प्रमुख, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT