Illegal Seed Seized Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal HTBT Seed : अवैध एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा मूर्तिजापूरमध्ये जप्त

Illegal Cotton Seed Seized : आगामी खरीप हंगामासाठी बाजारपेठेत अवैध मार्गाने बियाण्याची विक्री केली जात आहे. त्याबरोबरच प्रतिबंध असलेली एचटीबीटी बियाण्यांचाही धुमाकूळ सुरू आहे.

Team Agrowon

Akola News : आगामी खरीप हंगामासाठी बाजारपेठेत अवैध मार्गाने बियाण्याची विक्री केली जात आहे. त्याबरोबरच प्रतिबंध असलेली एचटीबीटी बियाण्यांचाही धुमाकूळ सुरू आहे. अशाच पद्धतीची अवैधरित्या जिल्ह्यात विक्रीसाठी आलेली एचटीबीटी बियाण्यांची पाकिटे कृषी विभागाच्या पथकाने मूर्तिजापूरमध्ये जप्त करून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. कृषी खात्याला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मूर्तिजापूर पॉइंटवर ट्रॅव्हल्सद्वारे एचटीबीटी कापूस बियाणे आणले जात होते. त्यानंतर मूर्तिजापूर शहर पोलीस तसेच कृषी विभागाच्या तालुका व जिल्हास्तरीय भरारी पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.

मूर्तिजापूर तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गोरे, डॉ. तुषार जाधव, मोहीम अधिकारी महेंद्रकुमार सालके, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीशकुमार दांडगे, कृषी अधिकारी विनोद शिंदे व मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

या कारवाईत आठ क्विंटल एचटीबीटी कापूस बियाणे जप्त केले. याची अंदाजे किमत १६ लाख रुपये आहे. तसेच साडेतीन लाख रुपये किमतीची वाहने असा मिळून १९ लाख ५० हजारांचा माल जप्त करण्यात आला.

श्री. गोरे यांनी अनोळखी व्यक्तींविरोधात बियाणे कायदा १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, कापूस बियाणे किंमत (नियंत्रण) आदेश २०१५, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९ व महाराष्ट्र कापूस बियाणे नियम २०१० इत्यादी कायद्यांनुसार मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कृषी विभागाकडून अशी कारवाई यापुढेही सुरू राहणार असून शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडूनच प्रमाणित बियाणे खरेदी करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT