MPKV, Rahuri  Agrowon
ॲग्रो विशेष

MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ‘क्रॉम्पटन ग्रीव्हज’बरोबर करार

Irrigation Management : महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि क्रॉम्पटन ग्रीव्हज कॉन्झुमर इलेक्ट्रिकल यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Mahesh Gaikwad, सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि क्रॉम्पटन ग्रीव्हज कॉन्झुमर इलेक्ट्रिकल यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. आधुनिक सिंचन पद्धतीसाठी पंपाची निवड, पंपाची देखभाल व वापर तसेच यावर आधारीत विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठीची प्रशिक्षणे यांचा समावेश आहे. प्रशिक्षणे व प्रात्यक्षिके ही आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग यांच्या प्रक्षेत्रावर उभारलेल्या सिंचन उद्यान येथे घेण्यात येणार आहेत.

महात्मा फुले विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन योजनेची माहिती मिळावी आणि त्याबाबत प्रशिक्षण मिळावे यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि क्रॉम्पटन ग्रीव्हज कॉन्झुमर इलेक्ट्रिकल यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.

कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील आणि कंपनीचे उपमहाव्यवस्थापक प्रशांत मुदलवाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषी) डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशिव पाटील, आंतरविद्या जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. महानंद माने उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. पाटील या वेळी म्हणाले की, पिकांच्या सिंचनासाठी लागणारे पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्यासाठी लागणारा पंप याला अधिक महत्त्व आहे. पुढील काळातील युद्ध हे पाण्यासाठी होण्याचे भाकीत असून पाणी हा अत्यंत मौलिक घटक आहे. विद्यापीठाने स्थापन केलेले सिंचन उद्यान हा विद्यार्थी व भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहे.

त्याठिकाणचे सिंचन व्यवस्था प्रात्यक्षिके तसेच खत व्यवस्थापन संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने सामंजस्य कराराला महत्त्व आहे. श्री. मुदलवाडकर यांनी कंपनीचे योगदान विषद केले व महात्मा फुले कृषी विद्यापीठाबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. रणपिसे यांनी हा सामंजस्य करार विद्यार्थी व संशोधकांना प्रशिक्षणासाठी चांगली संधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. डॉ. महानंद माने यांनी प्रास्ताविक केले. या वेळी डॉ. माने आणि श्री. मुदलवाडकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. डॉ. देविदास खेडकर यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT