Memorandum of Understanding Agrowon
ॲग्रो विशेष

Memorandum of Understanding : कोकण कृषी विद्यापीठ, सलाम किसान, प्राइम ग्रुप यांच्यात करार

Konkan Krushi Vidyapeeth : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि सलाम किसान, प्राइम ग्रुप यांच्यात सोमवारी (ता. २८) कृषी क्षेत्रातील एक महत्त्वाचा सामंजस्य करार झाला.

Team Agrowon

Ratnagiri News : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि सलाम किसान, प्राइम ग्रुप यांच्यात सोमवारी (ता. २८) कृषी क्षेत्रातील एक महत्त्वाचा सामंजस्य करार झाला.

या करारानुसार, दोन्ही संस्थांमध्ये कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शेतीच्या पद्धतीचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या सहकार्यातील प्रमुख क्षेत्रांमध्ये पीक सल्ला, ड्रोन वापरासाठी मानक कार्यपद्धती (SoPs) विकसित करणे याचा यात समावेश आहे.

या कराराच्या निमित्ताने कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हल्दणकर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, सहयोगी अधिष्ठाता (कृषी अभियांत्रिकी) डॉ. प्रशांत शहारे यांनी बोलताना नमूद केले, की या सहकार्यातून कृषी क्षेत्रात नावीन्य आणण्यासाठी आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी एकत्रितपणे कार्य केले जाईल. तसेच, कृषी उत्पादनांवर परिणाम करणाऱ्या कीड आणि रोगांच्या व्यवस्थापनासाठी तांत्रिक साहाय्य देखील उपलब्ध केले जाईल.

सलाम किसान, प्राइम ग्रुपच्या संस्थापिका धनश्री मानधनी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय खोब्रागडे यांनी सांगितले, की या सहकार्यातून शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती आणि ड्रोनसारखी साधने आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवन अधिक समृद्ध करण्याचा आमचा उद्देश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cultivation: अमेरिकेत सोयाबीन लागवड वाढणार

Jowar Arrival Increase: अहिल्यानगरला ज्वारीच्या आवकेत वाढ

Krushi Mitra Recruitment Scam: ‘कृषिमित्र’ नावाखाली बोगस भरतीचे पेव

Maharashtra Heatwave: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा कायम

Bordeaux Paste: फळझाडांसाठी बोर्डो पेस्ट घरच्या घरी कसे बनवावे?

SCROLL FOR NEXT