Soybean  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Producer : सोयाबीन उत्पादकांना मदत न दिल्यास आंदोलन

Soybean Disease : मूळकुज, चारकोल रॉट यांसह इतर कीडरोगांचा प्रादुर्भाव सोयाबीनवर झाला. त्यामुळे शेतकऱ्यांवर जणू आभाळच कोसळले आहे.

Team Agrowon

Wardha News : मूळकुज, चारकोल रॉट यांसह इतर कीडरोगांचा प्रादुर्भाव सोयाबीनवर झाला. त्यामुळे शेतकऱ्यांवर जणू आभाळच कोसळले आहे. त्याची दखल घेत सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासठी एकरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना या संदर्भाने निवेदन देण्यात आले. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये जोरात पाऊस झाला. त्यामुळे हिरवेगार आणि बहरावर असलेले सोयाबीन पीक पुरते उद्ध्वस्त झाले. मूळकुजमुळे सोयाबीनची पाने पिवळी पडत झाड सुकले.

त्याचा थेट परिणामी उत्पादकतेवर होणार आहे. बाजारात सोयाबीनला आधीच दर कमी आहेत. त्यातच उत्पादकता देखील कमी होईल, अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. त्याची दखल घेत शासनस्तरावर नुकसानग्रस्त भागात सर्व्हेक्षण व पंचनामे करण्यात यावे.

त्यासोबतच एकरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पीकविम्याची देखील १०० टक्‍के रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, अशी मागणी आहे. अन्यथा सरपंच संघटनेच्या वतीने प्रत्येक तालुक्‍यातील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत, रेणुका कोटंबकर, प्रसिद्धी प्रमुख विलास नवघरे, सचिन गावंडे, किशोर नेवल, राजु नौकरकार, मुरलीधर चौधरी, जगदीश वरटकर, गजानन गारघाटे, प्रशांत बोंद्रे, धीरज लेंडे, अजिंक्‍य धांदे, किसना शेंडे, सारंग डोंगरे, जितेंद्र दांडेकर यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT