Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : कारखान्याच्या ‘एमडी’च्या वयाचा तिढा सुटला

Sugar Industry : राज्यातील साखर कारखान्यांमधील कार्यकारी संचालकांच्या निवृत्तीचे वय नेमके किती असावे, याविषयी तयार झालेला संभ्रम अखेर शासनाने संपुष्टात आणला आहे.

मनोज कापडे

Pune News : राज्यातील साखर कारखान्यांमधील कार्यकारी संचालकांच्या निवृत्तीचे वय नेमके किती असावे, याविषयी तयार झालेला संभ्रम अखेर शासनाने संपुष्टात आणला आहे. आता वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत ‘एमडी’ मुदतवाढ मिळवू शकतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

वयाची ६० वर्षे पूर्ण होताच कारखान्यांमधील ‘एमडी’ला निवृत्त करावे, अशी अपेक्षा या पदासाठी पात्रताधारक असलेल्या इतर उमेदवारांची होती. परंतु अनेक ‘एमडी’ आपल्या कामाचा अनुभव, कौशल्य तसेच संचालकांच्या असलेल्या संबंधातून मुदतवाढ मिळवत होते.

राज्याच्या साखर आयुक्तांना योग्य वाटल्यास ते एक वर्षांची मुदतवाढ देऊ शकत होते. परंतु सहकार मंत्रालयाने ठरविल्यास अजून एका वर्षांची मुदतवाढ मिळत होती. निश्‍चित अटी नसल्यामुळे ‘एमडी’च्या मुदतवाढीच्या वयाबाबत राज्यभर गोंधळ होता.

नगर जिल्ह्यातील एका सहकारी साखर कारखान्याने या गोंधळात अजून भर टाकली. या कारखान्याने ‘एमडी’ला वयाच्या ६३ व्या वर्षांपर्यंत मुदतवाढ दिली. त्यातून तयार झालेला वाद थेट उच्च न्यायालयात गेला. ‘अॅग्रोवन’ने या घडामोडींवर प्रकाश टाकत ‘साखर कारखान्यांच्या ‘एमडीं’चे वय किती?’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते.

सहकार विभागाचे उपसचिव अंकुश शिंगाडे यांनी गुरुवारी (ता.१) याबाबत एक आदेश जारी करीत मुदतवाढीचे वय ६५ वर्षांपर्यंत करण्यात आल्याचे घोषित केले. मात्र संबंधित ‘एमडी’ने आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता केलेली नसावी, त्याची चौकशी प्रस्तावित नसावी अशा अटी टाकलेल्या आहेत. शिवाय, मुदतवाढीचा निर्णय साखर कारखान्याचे संचालक मंडळ परस्पर घेऊ शकत नाही. त्यासाठी साखर आयुक्तांमार्फतच प्रस्ताव जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

...या अटींवर मिळणार मुदतवाढ

- संबंधित एमडी भ्रष्टाचारमुक्त असावा

- मागील पाच वर्षांत कारखान्याचा संचित तोटा त्याने ७५ टक्क्यांच्या खाली आणलेला असावा

- मागील आर्थिक पत्रके पूर्ण केलेली व लेखापरीक्षण पूर्ण केलेले असावे

- उपपदार्थ प्रकल्पांमधील क्षमता ९० टक्क्यांपेक्षा जास्त वापरलेली असावी

- केंद्राचे व राज्याचे कर्ज, देणी वेळेत चुकती केलेली असावी

- वेतन व भत्ते मिळून ठरणाऱ्या रकमेपेक्षा जास्त एकत्रित वेतन मिळणार नाही

- मुदतवाढ ही पुनर्नियुक्ती समजली जाईल

- निवृत्तीनंतर कार्यरत नसलेल्या ‘एमडी’ला पुन्हा नियुक्ती देता येणार नाही

- मुदतवाढ प्राप्त करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या एमडी सक्षम हवा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT