Sugarcane Rate FRP agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : सहकारमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, दुसऱ्या हप्त्यासाठी राजू शेट्टींचा कारखान्यांसह प्रशासनाला इशारा

swabhimani shetkari sanghtana : ऊस दराच्या प्रश्नावर आज मुंबईत सहकारमंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांनी बैठक घेतली होती. परंतु तो निघू शकला नसल्याने राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिक घेतली आहे.

Swapnil Shinde

Raju Shetti Protest : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व शेतकरी संघटनांची बैठक पार पडली. मात्र, तोडगा निघू न शकल्याने ही बैठक निष्फळ ठरली.

गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. राजू शेट्टी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कार्यकर्त्यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात साखर कारखान्यांची ऊस वाहतूक अडवणूक केली जात आहे. त्यामुळे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष प्रा. डॅा. जालंदर पाटील उपस्थित होते. तर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिसीद्वारे माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित होते.

या बैठकीत अनेक साखर कारखानदारानी दुसरा हप्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे राजू शेट्टी यांनी आता आक्रमक पवित्रा इथून पुढचे आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे. या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सहकारमंत्र्यांसमोर आम्ही एक नव्हे तीन पाऊल मागे आलो आहे. त्यांना शेवटचं सांगितले आहे, आम्ही शेवट 100 रुपये घेण्यास तयारी दाखवली आहे. त्याखाली एक रुपया घेणार नाही, असे स्पष्ट केले.

तसेच साखर कारखान्यांनी आज सायंकाळपर्यंत दुसरा हप्ता जाहीर करावा, अन्यथा उद्यापासून पुणे-बेंगलोर महामार्गावर शिरोलीच्या टोलनाक्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे येत्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्या बद्दल संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Petrol Pump Closure: बुलडाणा जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद

Onion Prices Issues: बागलाण तहसीलमध्ये कांदा दरासाठी ठिय्या

Medical Shop Strike: औषध विक्रेत्यांचा आज संप

Jal Jeevan Mission: नळ पाणी योजनांच्या कामांना गती द्या : आमदार यड्रावकर

Underwater Tourism: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात ‘गुलदार’ची भर

SCROLL FOR NEXT