Onion Price Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Price : कांद्याच्या दरात घसरण सुरूच! सोलापूरनंतर नाशिक आणि पुण्यात भाव पडले

Onion Export Ban : कांदा निर्यात बंदीचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसत आहे. राज्यातील मोठ्या असणाऱ्या सोलापूर, नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांदा दर पडले असून कांदा दरात घसरण सुरूच आहे. आता पुण्यात देखील कांद्याचे भाव पडल्याचे समोर आले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. सोलापूर, नाशिक पाठोपाठ आता पुण्यात देखील कांद्याचा भाव पडले आहेत. येथील मार्केट यार्डमध्ये मंगळवार (३० रोजी) कांद्याची मोठी आवक झाल्याने तर आधीचा शिल्लक स्टॉकमुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. तसेच या दराच्या घसरणीत निर्यातबंदीचा मोठा हात आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतच आहे. तसेच याची झळ आता व्यापाऱ्यांनाही बसू लागली आहे.

केंद्र सरकारने फक्त व्यापारी आणि ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून महागाई रोखण्यावर काम केले आहे. तसेच महागाई रोखण्यासाठी अनेक निर्बंध लादले आहेत. तर आयातीचा धडाका लावला आहे. यामुळे राज्यासह देशातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. याचा सर्वाधिक फटका हा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. निर्यातबंदीमुळे कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे.

दरम्यान पुण्यातील मार्केट यार्डमध्ये आधीचा शिल्लक स्टॉक आणि कांद्याची मोठी झालेली आवक यामुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. तर ही घसरण निर्यात बंदीमुळे झाल्याचे बोलले जात आहे. तर येथील किरकोळ बाजारात कांद्याला केवळ २० किलो भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी देखील चिंतेत असून सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.

नाशकातही कांद्याचे भाव पडले

दरम्यान एक दिवसाआधीच नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यांच्याकडून येथे लिलाव बंद पाडण्यात आला होता. तर दोन तासानंतर लिलाव पुन्हा सुरू झाले होते. मात्र आज येथे मागणीेपक्षा जास्त कांद्याची आवक झाल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे. येथे कांद्याचे दर पुन्हा घसरले आहेत.

नाशिकमध्ये लिलाव बंद पाडला

दरम्यान या आठोवड्यात सोलापूर आणि नाशिकमध्ये कांद्याचे भाव पडल्याचे समोर आले होते. तर नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत सोमवारी २९ रोजी कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला होता. तसेच कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली होती. तसेच संतापलेल्या शेतकऱ्यांनीच थेट कांदा लिलाव बंद पाडला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT