Jalgaon Apmc Election Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon Apmc Election : बाजार समितीत निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर आता पाडापाडीच्या राजकारणाचा डाव

सहकार आणि बाजार समित्यांत पक्षीय राजकारण नसल्याचे सांगून एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे राजकारणी आता उमेदवारी नाकारल्याने पाडापाडीचा डाव खेळत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : सहकार आणि बाजार समित्यांत पक्षीय राजकारण नसल्याचे सांगून एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे राजकारणी आता उमेदवारी नाकारल्याने पाडापाडीचा डाव खेळत आहेत. पक्षीय निष्ठेचे जणू श्राद्धच घालण्यात आल्याचे दिसत आहे.

सेना-भाजपची राज्यात सत्ता आहे. पण नंदुरबार, पाचोरा येथे सेना (शिंदे गट) व भाजपात सामना रंगला आहे. तेथे अमोल शिंदे व सेनेचे आमदार किशोर पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जळगाव बाजार समिती सर्वांत महत्त्वाची मानली जाते.

या बाजार समितीत शिंदे गटातील चोपडा मतदार संघातील आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे बंधू श्यामकांत सोनवणे हे ठाकरे गट आणि महाविकास आघाडीत जाऊन युतीच्या पॅनेलला आव्हान देत आहेत.

युतीचे पॅनेल जळगावात गठित झाले आहे. त्यात भाजप व सेनेचे सक्रिय, निष्ठावान कार्यकर्ते कमी आणि नवखे अधिक, असे दिसत आहे. यात ज्यांना युती व महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी पाडापाडीच्या राजकारणात आता रस घेतला आहे.

नंदुरबारातही भाजपचे नेते तथा तेथील पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी या पारंपरिक विरोधकांत लढाई होत आहे. शहादा बाजार समितीत भाजपचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचे पुत्र अभिजित पाटील आणि भाजपचे आमदार राजेश पाडवी, नेते दीपक पाटील यांच्यातच सामना रंगला आहे.

पॅनेलसोबतही प्रचार आणि व्यक्तिगट भेटीगाठीदेखील

अनेकांना पॅनेलमध्ये उमेदवारी मिळाली आहे, परंतु व्यक्तिगट भेटीगाठीदेखील काही जण घेत आहेत. कारण विजयी होण्यासाठी खासगी भेटीदेखील फायदा मिळवून देतील, अशी रणनीती काही उमेदवारांनी आखली आहे. मतदारांना लक्ष्मी दर्शन घडविण्याची तयारीदेखील पॅनेलप्रमुख करीत आहेत.

निम्मा निधी गोळा झाला आहे, आणि निम्मा निधी उमेदवारांकडे मागितला जात आहे. यंदाची निवडणूक अधिक खर्चाची जाईल, असे उमेदवार खासगीत सांगत आहेत. मागील वेळेस ११ ते १२ पेट्या लागल्या आता काय १५ पेट्या लागतील का, असाही प्रश्‍न ही मंडळी उपस्थित करू लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT