Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Rain : नांदेडमध्ये भीज पावसामुळे पिकांना दिलासा

Rain Update : नांदेड जिल्ह्यात मागील २५ जूननंतर पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील पिकांना धोका निर्माण झाला होता. यापूर्वी केवळ हलका पाऊस झाला झाल्याने पिके जेमतेम पाण्यावर तग धरून होती.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात मंगळवारी (ता. एक) पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी १६२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

हा पाऊस जिल्ह्यातही सर्वच भागात कमी-अधीक प्रमाणात झाला. नांदेड, हदगाव, अर्धापूर, मुदखेड, किनवट, माहूर, बिलोली, उमरी तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. नांदेड जिल्ह्यात मागील २५ जूननंतर पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील पिकांना धोका निर्माण झाला होता.

यापूर्वी केवळ हलका पाऊस झाला झाल्याने पिके जेमतेम पाण्यावर तग धरून होती. अशातच भारतीय हवामान विभागाने मंगळवारी तसेच शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे मंगळवारी पावसाने हजेरी लावली. मंगळवारचा (ता. १७) पाऊस अनेक भागात झाला.

बुधवारी सकाळी दहा वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी १६.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी १६४.१० मिलिमीटरनुसार वार्षिक सरासरीच्या १८.५० टक्के पाऊस झाला आहे. हा पाऊस जिल्ह्यातही सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात झाला. परंतु पिकांसाठी मात्र अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

हलक्या पावसामुळे शेतकरी सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग, ज्वारी, हळद, ऊस व तूर या पिकांच्या आंतरमशागतीच्या कामाला लागले आहेत. तसेच अनेक ठिकाणी शेतकरी सोयाबीनसाठी तणनाशकाची फवारणी घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस

नांदेड २९.७०, बिलोली १८.१०, मुखेड ४.१०, कंधार ७.७०, लोहा ११.६०, हदगाव २०.३०, भोकर १९.३०, देगलूर ९.५०, किनवट १९.५०, मुदखेड २७.४०, हिमायतनगर १४.३०, माहूर १९.९०, धर्माबाद १४.३०, उमरी १८.५०, अर्धापूर २०.४०, नायगाव १०.३०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT