Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : अग्रिम विमा १५ डिसेंबरपूर्वी खात्यावर जमा करावा

Crop Insurance Compensation : १५ डिसेंबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा करावी, अन्यथा जिल्हाभरातील शेतकऱ्यांना घेऊन कंपनीला टाळे ठोको आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे बालाजी पाटील सांगवीकर व बालाजी पाटील ढोसणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

Team Agrowon

Nanded News : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप अग्रिम विमा जमा केला नाही. १५ डिसेंबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खत्यावर विमा रक्कम जमा करावी, अन्यथा जिल्हाभरातील शेतकऱ्यांना घेऊन कंपनीला टाळे ठोको आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे बालाजी पाटील सांगवीकर व बालाजी पाटील ढोसणे यांनी मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

यावर्षी जून, जुलै महिन्यात अतिवृष्टी, ढगफुटीने हाहाकार माजवला होता. त्यानंतर सलग पावसाचा खंड यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पीकविम्याची अधिसूचना लागू केली.

शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात एका महिन्यात विमा जमा होणे अपेक्षित होते. परंतु विमा कंपनीने विमा रक्कम अद्याप खात्यांत वर्ग केली नाही. यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांना अग्रिम विमा रक्कम मिळाली होती.

पण यावर्षी डिसेंबरचा पहिला आठवडा संपूनही चालढकल केली जात असल्याने शेतकरी पुत्र संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. पीकविमा कंपनीला १५ तारखेचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा १६ डिसेंबरला कंपनीला टाळे ठोकणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे. या वेळी बालाजी पाटील सांगवीकर, बालाजी पाटील ढोसणे, गणपत पाटील सुडके, प्रकाश शिंदे हसनाळकर, रावसाहेब शिंदे आदी शेतकरी उपस्थितीत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Summer Moong Sowing: खानदेशात उन्हाळ मूग पेरणीला प्रतिसाद

Sugar Export Ban: साखर निर्यात बंदी म्‍हणजे शेतकऱ्यांची लूट : अशोकराव थोरात

Swachhta Hi Seva Campaign: ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा ५०० वा टप्पा साजरा

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

SCROLL FOR NEXT