Parbhani News Agrowon
ॲग्रो विशेष

Dryland Farming : कोरडवाहू शेतीत हवामान बदलानुरूप तंत्रज्ञान अंगीकारा

Climate Change : कोरडवाहू शेती ही पावसावर आधारित आहे. हवामान बदलानुरुप तंत्रज्ञानाचा अंगीकार करून कोरडवाहू शेतीतील पीक उत्पादनात वाढ करणे शक्य आहे. माती व पाणी या नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे आवश्‍यक आहे.

Team Agrowon

Parbhani News : कोरडवाहू शेती ही पावसावर आधारित आहे. हवामान बदलानुरुप तंत्रज्ञानाचा अंगीकार करून कोरडवाहू शेतीतील पीक उत्पादनात वाढ करणे शक्य आहे. माती व पाणी या नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे आवश्‍यक आहे.

एकात्मिक शेती पद्धती, विद्यापीठाने विकसित वाण व कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विकसित केलेले विहीर, कूपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातर्फे गुरुवारी (ता. १५) आयोजित खरीप हंगाम नियोजन व शेतकरी मेळाव्‍यात ते बोलत होते.

या वेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य प्रवीण देशमुख, कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे सरपंच रामदास दळवे (बाभुळगाव), विठ्ठल धोतरे (उजंळबा), मारोती कदम (सोन्ना), बालासाहेब ढोले (आडगाव), डॉ. मदन पेंडके, डॉ. पपिता गौरखेडे आदींची उपस्थिती होती.

कोरडवाहू शेती संशोधन केंद्रामार्फत हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषी उपक्रम बाभूळगाव, उजळंबा, सोन्ना (सर्व ता. परभणी) या गावात शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येत आहे. कोरडवाहू एकात्मिक शेती पद्धती प्रकल्प आडगाव (ता. पालम) येथील शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येतो. या प्रकल्‍पांतर्गत निवडक शेतकऱ्यांना खरीप पीक प्रात्यक्षिकांसाठी विद्यापीठ विकसित केलेल्या सोयाबीन, तूर आदी पिकांच्या वाणांचे बियाण्याचे वाटप करण्यात आले.

डॉ. नारखेडे यांनी आंतरपीक पद्धती व एकात्मिक शेती पद्धती, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, आपत्कालीन पीक नियोजन, मूलस्थानी जलसंधारण याबद्दल मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. पेंडके यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गौरखेडे यांनी केले, तर आम्रपाली गुजंकर यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी मंगेश राऊत, शिवाजी काळे, विलास रिठे, मोरेश्‍वर राठोड, सुमीत सूर्यवंशी आदींनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT