Grampanchayat Agrowon
ॲग्रो विशेष

Grampanchayat Bhavan : सहा वर्षांनंतर मिळाली प्रशासकीय मान्यता

Grampanchayat Construction Scheme : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून २४ भवनांच्या प्रस्तावाला २०१८ मध्ये शासनाने मंजुरी दिली

Team Agrowon

Yavatmal News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून २४ भवनांच्या प्रस्तावाला २०१८ मध्ये शासनाने मंजुरी दिली. त्यानंतर सहा वर्षांनंतर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. कामासाठी निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यात बाराशेहून अधिक ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. त्यामधील बहुतांश ग्रामपंचायतींना अद्याप स्वत:ची इमारतदेखील नाही. परिणामी, ग्रामपंचायतींचा कारभार करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. काही ग्रामपंचायतींचा कारभार हा भाड्याच्या खोलीत सुरू आहे. ग्रामपंचायतींना भवन असावे, म्हणून तत्कालीन युती सरकारच्या काळात बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना भवन मंजूर करण्यात येणार होते. यासाठी पंचायत समितीकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्याभरातून एकूण २४ ग्रामपंचायतींची निवड झाली.

त्यात यवतमाळ, दिग्रस तालुक्यांतील प्रत्येकी चार, दारव्हा तीन, पांढरकवडा, वणी प्रत्येकी दोन, महागाव, बाभूळगाव, झरी जामणी, नेर, आर्णी, पुसद, महागाव, घाटंजी या तालुक्यांतील प्रत्येकी एक याप्रमाणे २४ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींचा प्रस्ताव जुलै २०२१ मध्ये शासन दरबारी पाठविण्यात आला आहे.

प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नव्हती. आता योजनेला निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. या योजनेत शासन ९० टक्के व ग्रामपंचायतींना स्वत:चा दहा टक्के निधी खर्च करावा लागणार आहे. त्यामधून प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वत:ची इमारत होणार आहे.

ग्रामपंचायत भवनाची दुरवस्था

अनेक ग्रामपंचायत इमारतींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून निधी मिळू शकतो. गेल्या चार वर्षांपासून निधी शासनाने दिलाच नव्हता. आता निधी मिळाल्याने कामाला गती येण्याची शक्यता आहे. यातून ग्रामपंचयात भवन चकाचक होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT