Maratha Reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Kunbi Record : सोलापुर जिल्ह्यातील ५८ गावांतील कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रशासन सज्ज

Maratha Reservation Update : मराठवाड्यातील ५८ गावांचा सोलापूर जिल्ह्यात समावेश आहे. या गावांचे १९५० पूर्वीचे कोणतेही दप्तर विद्यमान तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध नाही. यासाठी परंडा व तुळजापूर येथे जाऊन नोंदी शोधणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Solapur News : मराठवाड्यातील ५८ गावांचा सोलापूर जिल्ह्यात समावेश आहे. या गावांचे १९५० पूर्वीचे कोणतेही दप्तर विद्यमान तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध नाही. यासाठी परंडा व तुळजापूर येथे जाऊन नोंदी शोधणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशात स्पष्टता नसल्याने अजून, या कामात सुसूत्रता येण्याची गरज आहे.

मराठवाडा मुक्तिनंतर सोलापूर जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यातील ५८ गावांचा समावेश करण्यात आला तर सोलापूर जिल्ह्यातील ११ गावे धाराशिव जिल्ह्याला जोडण्यात आली होती. आताच्या सोलापूर जिल्ह्यात असलेली ही ५८ गावे मुळची परंडा व तुळजापूर तालुक्यातील आहेत.

सध्या ही गावे माढा, मोहोळ, बार्शी व उत्तर सोलापूर तालुक्यात आहेत. सध्या सुरू असलेल्या कुणबी नोंदीच्या तपासात जिल्हा प्रशासनाला मुक्तिपूर्व मराठवाड्यातील या ५८ गावांचे १९५० पूर्वीचे दप्तर मिळाले नसल्याने अडचणी येत आहेत. या गावच्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी तुळजापूर व परंडा तालुक्याच्या तहसील कार्यालयातील जुने दप्तर तपासण्यात यावेत, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी २१ नोव्हेंबर रोजी दिले आहेत.

या आदेशानुसार २२ नोव्हेंबर रोजी माढ्याच्या तहसीलदारांनी जामगाव, केवड, सुलतानपूर, अंजनगाव, वडाचीवाडी, रिधोरे, खैराव, बुद्रकवाडी, मानेगाव, पवारवाडी यागावाच्या नोंदी तपासणीचे आदेश तलाठी एन.एम. गोडसे, सी.एन. चिवटे, एम.जी नागटिळक, ए.एस.ढवण यांना दिले आहेत. त्यांनी परंडा येथे दप्तर तपासणीदेखील सुरू केलेली आहे.

मात्र, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिलेल्या आदेशात ५८ गावांचा स्पष्ट उल्लेख नसून, केवळ ३८ गावांची नावे आहेत. यामुळे या कामात सुसूत्रता येणे कठीण आहे. याशिवाय नेमकी कोणती गावे परंडा तालुक्यातील आहेत व कोणती तुळजापूर तालुक्यातील आहेत.

आम्ही आजच तुळजापूर तहसील कार्यालयास भेट दिली. तुळजापूर येथील रेकॉर्ड रुममध्ये तपास घेतला असता, येथे अशी माहिती मिळते की, येथील दप्तर उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाकडे यापूर्वीच वर्ग करण्यात आले आहे. ५८ गावच्या ग्रामस्थांना दप्तर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोलापूर जिल्हा प्रशासनाची आहे.
- पंडित ढवण, ग्रामस्थ, एकुरके ता. मोहोळ.
मुक्तिपूर्व ५८ गावातील कुणबी नोंदीचा तपास सुरू आहे. गॅझेटमधील ५८ गावांचा शोध घेऊन पूर्ण यादीनिशी तहसीलदारांना सोमवारी नवे आदेश पाठविण्यात येणार आहेत.
दादासाहेब कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT