Crop Insurance Agrown
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविम्यासाठी जादा शुल्क घेणाऱ्या जनसुविधा केंद्रावर कारवाई

Crop Insurance Scheme : खरीप पीकविमा अर्ज दाखल करण्यासाठी जनसुविधा केंद्र चालक निर्धारित शुल्कापेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांकडून घेत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या.

माणिक रासवे

Hingoli News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या (२०२४) खरीप हंगामात खरीप पीकविमा अर्ज दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांकडून निर्धारित शुल्का व्यतिरिक्त अतिरिक्त पैसे आकारल्यामुळे खंडाळा (ता. हिंगोली) येथील एका जनसुविधा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र -कॉमन सर्विस सेंटर) बंद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

खरीप पीकविमा अर्ज दाखल करण्यासाठी जनसुविधा केंद्र चालक निर्धारित शुल्कापेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांकडून घेत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या.

त्यानंतर खंडाळा येथील जनसुविधा केंद्र बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व इतर योजनांस अर्ज करताना नागरिकांना विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते.

ही प्रमाणपत्रे, दाखले या सेवांकरिता नागरिक आपले सरकार केंद्रावर जाऊन अर्ज करतात. परंतु हे दाखले, प्रमाणपत्र देण्यासाठी जनसुविधा चालकाकडून अधिकची रक्कम घेतली जाते. जनसुविधा केंद्रचालकांनी निर्धारित सेवाशुल्क व्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क आकारू नयेत.

निर्धारित सेवाशुल्क व्यतिरिक्त नागरिकाकडून आपले सरकार सेवा केंद्रचालकांनी इतर कोणतेही शुल्क आकारल्यास नागरिकांनी संबंधित तहसीलदारांकडे लेखी स्वरूपात तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT