Sand Mafia  Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Sand Excavation : खडकपूर्णातून अवैध वाळूउपसा, वाहतुकीच्या बोटी उद्ध्वस्त

Sand Mafia : सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक आणि एनडीआरएफच्या पथकाने शोध मोहीम राबवत खडकपूर्णा धरणात चालणाऱ्या अवैध बोटींवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती.

Team Agrowon

Buldana News : देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणातून होणाऱ्या अवैध वाळूउपसा व वाहतुकीविरोधात कारवाई करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सिंदखेडराजा व बुलडाणा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकांनी जिल्हास्तरीय शोध पथकाच्या सहाय्याने सिनगाव जहाँगीर भागात दोन बोटी व इसरूळ व बायगाव शिवारात एक बोट अशा तीन बोटी जिलेटिनच्या सह्याने उडवून दिल्या. बोटीत सापडलेल्या तीन मजुरांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक आणि एनडीआरएफच्या पथकाने शोध मोहीम राबवत खडकपूर्णा धरणात चालणाऱ्या अवैध बोटींवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती.

या कारवाई दरम्यान सिंदखेडराजा व बुलडाण्याचे पथक जालन्यातील जाफ्राबाद तहसीलदारांच्या पथकाच्या सातत्याने संपर्कात होते. या पथकांनी एकमेकांच्या संपर्कात राहून बुलडाणा जिल्ह्याच्या हद्दीतून जालन्याच्या हद्दीत जाणाऱ्या सहा बोटींसह सहा छोट्या बोटी अशा एकूण बारा बोटी जाफ्राबाद पथकाने पकडून व त्याही उद्ध्वस्त केल्या.

या संयुक्त कारवाईत खडकपूर्णा भागात एकूण तीन तर जाफ्राबाद तालुक्यात १२ अशा एकूण १५ बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी शोध पथक व जिलेटिनच्या सहाय्य प्रशासनाकडून पुरविण्यात आले होते.

जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी कारवाई सुरू आहे. पोलिस, आरटीओ, महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्देश दिले असून कारवाई केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT