Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : आठ दिवसात मागण्या मान्य करा, अन्यथा अन्न त्याग आंदोलन करणार; दूध उत्पादक कृती समितीचा इशारा

एकीकडे खाजगी दूध संघाने दूध खरेदी दर कमी केले आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारने दूध पावडर आयातीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे दूध उत्पादक संताप व्यक्त करत आहेत. अन्नत्याग आंदोलनाच्या इशाऱ्याचे निवेदन समितीनं मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

Dhananjay Sanap

दुधाला ४० रुपये प्रतिलिटरचा दर मिळावा यासह विविध मागण्यांसाठी दूध उत्पादक कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आठ दिवसात मागण्या मान्य केल्या नाही तर शिखर शिंगणापुर ते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधी स्थळावर अन्न त्याग आंदोलन करण्याचा इशारा समितीनं निवदेनात दिला आहे. एकीकडे खाजगी दूध संघाने दूध खरेदी दर कमी केले आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारने दूध पावडर आयातीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे दूध उत्पादक संताप व्यक्त करत आहेत. अन्नत्याग आंदोलनाच्या इशाऱ्याचे निवेदन समितीनं मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

मागील वर्षभरात दूध खरेदी दर ४० वरून २६ रुपये प्रतिलिटरवर आले आहे. त्यामुळं दूध उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. कारण पशूखाद्याचे दर वाढले आहेत. उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागत आहे. नागपूर अधिवेशनात मंत्री विखे यांनी ३५ रुपये दर देण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात मात्र दूध संघांकडून २५ रुपये दराने दूध खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना धुमसत आहे.

आठ दिवसात मागण्या मान्य केल्या नाही तर अन्न त्याग करणार असल्याची भूमिकाही समितीने घेतली आहे. तसेच मागण्या मान्य झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही, असा इशाराही निवेदनात सांगण्यात आलं आहे.

Letter

प्रमुख मागण्या

- दुधाला प्रतिलिटर ४० रुपये दर मिळावा.

-पशूखाद्याच्या गुणवत्तेवर सरकारने नियंत्रण ठेवावं.

- भेसळयुक्त दुधाचा महापुर रोखावा अन्यथा एफडीआय खाते बंद करावे.

- ११/०३/२०२४ ते ३०/०६/२०२४ पर्यंतचे अनुदान किचकट अटी नियम न घालता सरकारने सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना द्यावं.

- उत्तर प्रदेश राज्याच्या धरतीवर भाकड जनावरांना प्रति महिना दीड हजार रुपये अनुदान द्यावे.

- वजन मापे गुण नियंत्रक विभागाने प्रत्येक डेअरीवर दरमहा तपासणी पथके निर्माण करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT