Paddy  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy : पश्‍चिम पट्ट्यात भात लागवडीला वेग

गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात पावसाने उघडीप दिली असल्यामुळे रखडलेल्या भात लागवडीला वेग आला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात पावसाने उघडीप दिली असल्यामुळे रखडलेल्या भात लागवडीला वेग आला आहे. उशिरा का होईना पाऊस झाल्याने चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, आतापर्यंत भाताच्या ५९ हजार ६२७ हेक्टरपैकी ३ हजार ७३८ हेक्टर म्हणजेच ६ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

जूनच्या सुरुवातीला जिल्ह्याच्या भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर, हवेली या तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी लगबग सुरू झाली होती. लवकरच चांगला पाऊस होईल म्हणून या आशेने शेतीकामांना वेग आला होता. परंतु काही प्रमाणात भात लागवड झाल्यानंतर पावसाने दडी मारण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता. जुलै महिना उजाडला तरी पाऊस न झाल्याने या वर्षी भात लागवड होणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना भासू लागली होती. मात्र दोन ते तीन जुलैपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने या भात पट्ट्यातील तालुक्यात जोरदार पाऊस पडला. विशेषतः धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने पाणीपातळीतही वाढ झाली. तसेच भात खाचरे तुडुंब भरून वाहू लागली. धरणात झालेल्या पावसामुळे भात लागवडीतील अडथळा कमी झाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा भात लागवडी करण्यास वेगाने सुरुवात केली आहे.

पुणे जिल्ह्यातील सात ते आठ तालुके भाताचे आगार (Paddy Hub) म्हणून ओळखले जातात. त्यावरच या परिसरातील अनेक कुटुंबे भात शेतीवरच (Paddy Farming) अवलंबून आहेत. गेल्या वर्षी अतिवृष्टी (Heavy Rain) झाल्याने भात पिकांचे (Paddy Crop Damage) अतोनात नुकसान झाले होते. यामुळे आर्थिक प्रश्‍न उपस्थित झाला होता. या वर्षी पावसाने रोपवाटिका टाकल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. परंतु उशिराने का होईना पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. हाच पाऊस पाऊस अजून लांबणीवर गेला असता तर भात पिकांचे व रोपांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना होती. परंतु उशिराने मुसळधार झालेल्या पावसामुळे भात उत्पादकांची चिंता कमी झाली आहे.

तालुकानिहाय झालेली भात लागवड, हेक्टरमध्ये

तालुका --- भात लागवड

भोर --- ११२६

मावळ ---- ४५६

वेल्हे --- २६५

मुळशी -- ३५०

जुन्नर --- १३५

खेड --- ८८९

आंबेगाव -- ४१६

हवेली -- ९८

पुरंदर -- ३

एकूण -- ३७३८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT