Onion Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : खानदेशात आगाप कांदा लागवडीला वेग

Onion Sowing : खानदेशात रब्बीमधील आगाप कांदा लागवडीस या आठवड्यात काही भागांत सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बीमधील आगाप कांदा लागवडीस या आठवड्यात काही भागांत सुरुवात झाली आहे. पण मजूरटंचाईमुळे लागवड रखडत सुरू आहे. यातच यंदा लागवड वाढेल, असे चित्र आहे.

कांदा लागवडीची कार्यवाही जळगावमधील जळगाव, यावल, चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, जामनेर यांसह धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारातील नंदुरबार, शहादा भागात सुरू आहे. दर स्थिर असल्याने यंदा लागवड स्थिर राहील, असे सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे.

मागील हंगामात उन्हाळ कांद्याची खानदेशात सुमारे ११ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. मागील उन्हाळ हंगामात लागवडदेखील नोव्हेंबरच्या अखेरीस व डिसेंबर, जानेवारीत झाली होती. आता मात्र आगाप लागवड या महिन्यातच सुरू झाली आहे.

आगाप लागवड सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. धुळ्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा, जळगावातील चोपडा, यावल, जळगाव, धरणगाव या भागांत लागवड पुढील महिन्यात गती घेईल, असा अंदाज आहे. कारण या भागात डिसेंबरमध्ये लागवडीच्या दृष्टीने कांदा रोपवाटिकांची निर्मिती शेतकऱ्यांनी केली आहे.

सध्या लागवड संथ गतीने सुरू असून, सर्वत्र लागवडीला पुढे वेग येणार आहे. अनेक भागांत मजूरटंचाई असून, लागवडीसंबंधी कार्यवाही शेतकरी कशीबशी किंवा कुटुंबातील मंडळीच्या मदतीने करून घेत आहे.

लागवडीसाठी अनेक शेतकरी बाहेर गावांतून वाहतूक भाडे खर्च करून मजूर आणत आहेत. लागवडीसाठी १८० ते २०० रुपये रोज, अशी मजुरी दिली जात आहे. सलग सात ते आठ तास लागवडीसंबंधी अधिक मजुरी देऊ करीत आहेत. मजुरीचे दर विभाग किंवा क्षेत्रनिहाय वेगवेगळे आहेत.

रोपे मुबलक

कांदा रोपांचे दरही अधिक झाले आहेत. तसेच रोपांबाबतचे परावलंबित्व लागवडीच्या कार्यवाहीत अडसर ठरते. यामुळे कमाल कांदा उत्पादकांनी आपापल्या रोपवाटिका तयार केल्या होत्या. या रोपवाटिकांतील रोपे आता पुनर्लागवडीसाठी तयार झाली आहेत.

काही शेतकऱ्यांनी रोपांची लागवड केल्यानंतर शिल्लक रोपांची विक्रीही सुरू केली आहे. रोपेही खानदेशात मुबलक आहेत. कारण रोपांचे नुकसान, रोगराई अशी समस्या रोपवाटिकांत नव्हती. अनेकांनी दर्जेदार बियाण्याचा उपयोग करून रोपवाटिका तयार केल्या होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

Solar Energy Projects: सांगलीत मागणीच्या ४० टक्के विजेची जिल्ह्यामध्येच निर्मिती

Healthy Village Campaign: ‘माझं गाव- आरोग्य संपन्न गाव’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Chinese Illegal Raisin: चीनच्या बेकायदा बेदाण्यामुळे शेतकरी संतप्त

Cotton Cultivation: कापूस लागवडीकडे कल, ‘एचटीबीटी’ शिरकावाची धास्ती

SCROLL FOR NEXT