Cotton procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Procurement : कापूस नोंदणीसाठी स्वतः उपस्थित राहण्याची अट रद्द करा

CCI Cotton Procurement : ‘सीसीआय’चे मुख्य कार्यकारी संचालक ललित कुमार गुप्ता यांना याबाबत त्यांनी निवेदन दिले.

Team Agrowon

Akola News : ‘सीसीआय’ची कापूस खरेदी करण्यासाठी नोंदणीला शेतकरी स्वतः हजर राहण्याची अट शिथिल करून रक्ताच्या नात्यातील किंवा कुटुंबातील मुख्य व्यक्तीला उपस्थित राहण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचडे यांनी केली.

‘सीसीआय’चे मुख्य कार्यकारी संचालक ललित कुमार गुप्ता यांना याबाबत त्यांनी निवेदन दिले. ललित कुमार गुप्ता यांनी बाजार समितीला भेट दिली तेंव्हा पदाधिकाऱ्यांतर्फे निवेदन देण्यात आले.

अकोट येथे भारतीय कपास निगम लि. (सीसीआय) यांची कापूस खरेदी सुरू आहे. त्यासाठी पूर्व नोंदणी सुरू झाली. परंतु नोंदणी करते वेळी शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नोंदणी करते वेळी स्वतः ज्याचे नावे सातबारा आहे, त्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य केलेले आहे.

परंतु, शेतकऱ्यांमध्ये बरेच वृद्ध व महिला असून काही शिक्षण व काही कामांसाठी बाहेरगावी असल्यामुळे स्वतः उपस्थित राहणे शक्य होत नाही. त्यामुळे कुटुंबातील मुख्य किंवा रक्तातील नात्यातील व्यक्तीला नोंदणी करताना उभे राहण्याचे अधिकार देण्यात यावे.

या भागात कापसाचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांना कापूस विक्रीकरिता अकोट येथे न येता चोहोट्टा बाजार येथे खरेदी केंद्र सुरू केल्यास त्याचा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होईल. यासाठी चोहोट्टा येथेही कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणीही संचालकांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT