Agriculture Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Abhay Yojana : अकोला परिमंडलातील महावितरणची अभय योजना

Team Agrowon

Akola News : वीजबिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या अकोला परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील दोन लाख २१ हजार ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना आणली आहे. यामध्ये सहभागी होऊन थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

थकबाकीदार ग्राहकांनी मुद्दल रक्कम भरल्यास थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण २७ कोटी ६६ लाख रुपये माफ होणार आहेत, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली. राज्यात ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही.

योजनेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे.

तथापि, थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी ग्राहकांना एक संधी म्हणून सवलतीची योजना लागू केली आहे. त्यानुसार महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ग्राहकांना दिलासा देण्यासाठी १ सप्टेंबरपासून ही योजना राज्यात लागू करण्यात आली आहे.

खंडित वीजपुरवठा ग्राहक

जिल्हा पात्र ग्राहक मूळ थकबाकी व्याज व विलंब आकार

अकोला ६२५७८ ६३ कोटी १३ लाख ८ कोटी ७९ लाख.

बुलडाणा १००७१४ ८२ कोटी २९ लाख १२ कोटी ०३ लाख.

वाशिम ५७८४७ ५२ कोटी १२ लाख ६ कोटी ८४ लाख.

सहा हप्त्यांत थकबाकी भरता येणार

योजनेत मुद्दल बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून ऊर्वरित ७० टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सोय आहे.

जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल.

उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळेल.

संबंधित वीज ग्राहकांना महाडिस्कॉम या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT