Tractor Accident Agrowon
ॲग्रो विशेष

Accident News : अकिवाटमध्ये ट्रॅक्टर नदीत कोसळला; एकाचा मृत्‍यू, दोघेजण बेपत्ता

Tractor Accident : गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच शेतातील केळी काढण्यासाठी अकिवाट (ता. शिरोळ) येथे पुराच्या पाण्यातून जात असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट नदीत कोसळून मोठी दुर्घटना घडली.

Team Agrowon

Kolhapur News : गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच शेतातील केळी काढण्यासाठी अकिवाट (ता. शिरोळ) येथे पुराच्या पाण्यातून जात असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट नदीत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात सहा जण नदीत वाहून गेले. या पैकी एकाचा मृत्यू झाला असून, दोघे जण अद्याप बेपत्ता आहेत. तर तिघे जण सुरक्षितपणे पोहून काठावर आले.

शुक्रवारी (ता. २) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. शिरोळ तालुका पुराच्या चिंतेत असतानाच या दुर्घटनेने खळबळ उडाली. शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत बेपत्ता व्‍यक्‍ती सापडल्या नव्हत्‍या. घटनेची माहिती मिळताच आपत्तीकालीन विभागाचे कर्मचारी तसेच शासकीय यंत्रणेने बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे. सध्या तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पाणी आले आहे.

आठ ते दहा दिवसांपासून पाणी आल्याने अनेक वाटा बंद आहेत. बस्तवाड-आकिवाट मार्गावर धरण पूल असून या पुलावरून सकाळी नऊ वाजता शेतातील केळी काढण्यासाठी एका ट्रॅक्टरमध्ये बसून सहा जण निघाले होते. नदीच्या पुलावर ट्रॅक्टर आला असता पाण्याला ओढ असल्याने ट्रॅक्टर रस्ता सोडून नदीपात्राच्या दिशेने सरकू लागला.

या दरम्यान ट्रॅक्टरचालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट नदीच्या पात्रात उलटला. यात सहा जणही नदीपात्रात पडले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी नदी किनारी मोठी गर्दी केली. ‘एनडीआरएफ’च्या पथकांना अद्याप बेपत्ता झालेल्यांचा शोध लागलेला नाही. यांत्रिक बोटीच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू आहे.

सरपंचाच्या पतीचा मृत्यू; माजी जिल्हा परिषद सदस्य बेपत्ता

अकिवाटच्या सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचे या दुर्घटनेत निधन झाले. तर माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार व अण्णासाहेब हसुरे हे अद्याप बेपत्ता आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने आदींसह जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याचा आढावा घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT