Paddy Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop : भाताच्या भाऱ्यांना ताडपत्रीचे कवच

Paddy Harvesting : सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे कधीही पाऊस पडू शकतो, या शक्यतेने तालुक्यातील शेतकरी भीतीच्या छायेत आहेत.

Team Agrowon

Palghar News : सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे कधीही पाऊस पडू शकतो, या शक्यतेने तालुक्यातील शेतकरी भीतीच्या छायेत आहेत. खळ्यावर रचून ठेवलेल्या भातपिकाच्या भाऱ्यांचे उडवे अवकाळी पावसात भिजून भात आणि पेंढा खराब होईल, या भीतीने संरक्षण म्हणून उडव्यांवर प्लॅस्टिकच्या ताडपत्रीचे आवरण टाकून झाकून ठेवण्यात आले आहेत.

तालुक्यात सध्या सर्वत्र झोडणीचा हंगाम जोरदार सुरू असून मजुरांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. झोडणीसाठी मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची झोडणीची कामे खोळंबली आहेत.

निसर्गाचा लहरीपणा, मजुरांचा तुटवडा अशा विविध संकटांवर मात करून तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक कसेबसे खळ्यावर आणले आहे. ते खळ्यावर आणून त्याचे उडवे रचले आहेत, तर काही भागात हे पीक झोडणी करून घरात सुरक्षित घेण्याची लगबग सुरू आहे.

शेतकरी बांधव नैसर्गिक संकटांसमोर हतबल न होता मोठ्या धैर्याने त्यांना तोंड देत आहे. मेहनतीने तयार केलेले भातपीक भिजून खराब होऊ नये, यासाठी खळ्यावर ठेवलेल्या उडव्यांवर प्लॅस्टिक ताडपत्रीचे आवरण टाकून झाकून ठेवल्याचे शेतकरी सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: तुटलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारखान्यांकडे मागणी

FFS Fertilizer Booking System: खत ‘ऑनलाइन बुकिंग’ला नऊ जिल्ह्यांमध्ये सुरुवात

Farm Loan Waiver Lists: दर पंधरा दिवसांनी कर्जमाफीच्या याद्या येणार: मुख्यमंत्री फडणवीस

Wheat Export Ban Lifts: केंद्र सरकारने गहू निर्यातीवरील बंदी उठविली

Pune Rain: घाटमाथ्यावर तुरळक सरी

SCROLL FOR NEXT