Paracamando Agrowon
ॲग्रो विशेष

अल्पभूधारक शेतकरीपुत्र झाला पॅराकमांडो

चंद्रमोडी झोपडीत राहून मिळेल ते काम करायच अन् आपल्या कुटुंबाचं रहाटगाडगे चालवायचं. अशा गरीब अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात सध्या अतिशय आनंदाचं वातावरण आहे. कारण त्यांचा मुलगा आता पॅरा कमांडो झालाय.

संदीप रायपूरे 

गोंडपिपरी, जि. चंद्रपूर ः चंद्रमोडी झोपडीत राहून मिळेल ते काम करायच अन् आपल्या कुटुंबाचं रहाटगाडगे चालवायचं. अशा गरीब अल्पभूधारक शेतकरी (Small Holder Farmer) कुटुंबात सध्या अतिशय आनंदाचं वातावरण आहे. कारण त्यांचा मुलगा आता पॅरा कमांडो झालाय. तब्बल वीस हजार सैनिकांतून केवळ चार सैनिकांची यासाठी निवड करण्यात आली. गणेश पोरटे असे या तरुणाचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वटराणा गावचा रहिवासी आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील वटराणा हे आदिवासीबहुल गाव. अनेकांकडे असलेली तुटपुंजी शेती व शेतमजुरी हेच त्यांच्या जीवनाच साधन. गणेश पोरटे हा तरुण अशाच एका अल्पभूधारक शेतमजूरी कुंटुबातील तरुण.गणेशचं बारावीपर्यंतच शिक्षण गोंडपिपरींच्या जनता विद्यालयात झाले. घरची परिस्थिती बघता स्वतः काम करून त्यानं शिक्षण घेतले. देशसेवेचा ध्यास घेत त्याने सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. दोनदा अपयश आले.पण न खचता त्याने प्रयत्न सुरू ठेवले अन् शेवटी त्याला यश मिळाले. पुलवामा येथे रणगाडा पथकात तो दाखल झाला.

सैन्यात निवड झालेल्या सैनिकांना विशेष प्रशिक्षण घेऊन पॅराकमांडोचा दर्जा मिळत असतो. पण त्यासाठी अतिशय खडतर प्रशिक्षण घ्यावे लागते. ९० दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात विविध कठीण टप्पे पार पाडावे लागतात. ३६ तासांत १७ किलोचे वजन घेऊन १०० किलोमीटरचे अंतर गाठावे लागते. सोबत १० हजार स्क्वेअर फुटांवरून उडी मारणे, जंगलात रांत्रदिवस वास्तव करणे, यासह अतिशय कठीण परिस्थीतीत हे प्रशिक्षण पूर्ण दिल्या जाते.

पॅराकमांडोचे प्रशिक्षण हे सर्वात कठीण प्रशिक्षण मानले जाते. यात शारीरिक क्षमतेसोबत मानसिक क्षमतेची पराकोटीची कसोटी लागते. गणेशने हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. पॅराकमांडो झाल्यानंतर त्यांना मरिन कॅप दिली जाते. सोबत स्पेशल फोर्स मध्ये त्यांचा समावेश होतो. गणेशच्या यशाचा त्याच्या मित्रमंडळींना प्रचंड आनंद झाला आहे. गणेशच्या वाटचालीत त्याचा मावसभाऊ प्रशांत भोयर व भाऊजी कांताजी खेडकर यांची मोलाची साथ मिळाली.

गणेश ठरला अनेकांसाठी आदर्श

पॅराकमांडो होणे अतिशय कठीण असताना गोंडपिपरी तालुक्यातील एका तरुणाने ही कामगिरी केली. याची माहिती कळताच अनेकांनी गणेशबाबत गौरवोद्गार काढले आहेत. ध्येयाची वाटचाल, सातत्यपूर्ण प्रयत्न, प्रचंड परिश्रम अन् संयम ठेवला की कुठलंही यश गाठता येते हे गणेश दाखवून दिल आहे. त्याची ही वाटचाल अनेकांसाठी आदर्श ठरणारी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT