Lychee Update Agrowon
ॲग्रो विशेष

Sunil Tambe : जगणं समृद्ध करणारे मोसम

Indian Agriculture : मे महिन्याच्या अखेरीस काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडातून चेरी येतील. दशेरी, लंगडा, आम्रपाली, जरदालू या आंब्यांचा हंगाम जूनमध्ये सुरू होतो. गंगा-यमुनेच्या पट्ट्यात.

सुनील तांबे

सुनील तांबे

Lychee Update : परवा भाजीगल्लीत लिचीचे घड आले. त्रिपुरा, आसाम, बिहार आणि पंजाबात लिचीचं उत्पादन घेतात. लिचीला भरपूर पाणी लागतं. खुडणी केल्यावर लिची काही दिवसच ताजी, रसरशीत राहाते. शीतगृहात दोन-तीन आठवडे ठेवता येते.

बिहार, आसाम, त्रिपुरा इथे शीतगृह नाहीत. त्यामुळे तिथली लिची उत्तम असली तरीही भाव मिळत नाही. बिहारमधून ट्रेनने जात होतो. ट्रेन थांबली. बराच वेळ. चौकशी केली तेव्हा समजलं ड्रायव्हर आणि गार्ड लिची आणायला गेले होते.

मे महिन्याच्या अखेरीस काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडातून चेरी येतील. दशेरी, लंगडा, आम्रपाली, जरदालू या आंब्यांचा हंगाम जूनमध्ये सुरू होतो. गंगा-यमुनेच्या पट्ट्यात.

जूनमध्ये कच्छमधून खारीक वा डेट्‍स येतात. कच्छमध्ये खारकांचे अनेक प्रकार. सर्वोत्तम खारीक निर्यात होते. या हंगामात एकदा मी कच्छमध्ये होतो. अनेक शेतातल्या खारकांचा आस्वाद घेतला. निर्यात न झालेला बचाखुचा माल मुंबईत येतो.

जुलै महिन्यात आलूबुखार, खुबानी ही फळं काढणीला येतात. त्यासोबत हिरवे बदाम आणि पीच. ऑगस्टमध्ये सफरचंदांचा हंगाम सुरू होतो.

हा हंगाम थेट नोव्हेंबरपर्यंत असतो. हिमाचल प्रदेशात एका शेतकऱ्याकडे राहायला होतो. हिरव्या बदामाचं सूप, पीचची चटणी, डाळ, भात, रोटी असं साधं जेवण. दारात नासपतीचं (पेअर) झाड होतं. एक ट्रकभर फळं लागतात, तो म्हणाला.

डिसेंबरमध्ये पेरू येतात. अलहाबादचे पेरू सर्वोत्तम असतात. अलीकडे बाजारात नारळाएवढे हिरवेगार पेरू येतात. कुठचं वाण आहे कोण जाणे! त्याला चव नसते. कोणत्याही महिन्यात ते असतातच. पपई वा डाळिंब वा केळीसारखे.

नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत काढलेले मेघालयातले अनननस सर्वश्रेष्ठ. तिकडचा अननस कमालीचा रसाळ म्हणजे कापतानाच त्यातून रस वाहू लागतो.

जानेवारीपासून द्राक्षे येतात बाजारात. नाशिकची एक्स्पोर्ट क्वालिटीची- त्यातही युरोपला निर्यात होणारी- द्राक्षे सर्वश्रेष्ठ असतात. त्यांचा आकार, रंग, चव, त्यातली साखर सर्व काही एखाद्या रेसिपीसारखं असतं. फोटोसिंथेसिस सोडलं तर द्राक्ष हे इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट आहे.

शेतीमालाच्या बाजारपेठेचं वृत्तांकन करण्यात हा आनंद असतो. विविध पिकांचे, फुलांचे, फळांचे मौसम, त्यांच्या चवीढवी यांच्याशी ओळख होते. माणसांच्या सद्‍गुणांचेही मोसम असतात. प्रदेशानुसार ते बदलतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Titling Act: महाराष्ट्रात 'लँड टायटलिंग ॲक्ट'ची तयारी अंतिम टप्प्यात; समिती गठित, जमिनींचे मालकी हक्क होणार सुरक्षित

Seed Germination: निकृष्ट बियाण्यामुळे विदर्भात सोयाबीन पेरणी रखडली

Seed Germination: नांदेड जिल्ह्यात बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत १७४ तक्रारी

Agri Service Centre: तेरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Rainfall Deficit: परभणीत ६७.२ मिमी, तर हिंगोली जिल्ह्यात ५०.५ मिमी कमी पाऊस

SCROLL FOR NEXT