Protest For Water  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Protest For Water : वैजापूर व गंगापूर तालुक्यातील नांदूर मधमेश्वर जलद कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतर्फे पाणी आवर्तनासाठी शुक्रवारी (ता. ३) वैजापूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : जापूर व गंगापूर तालुक्यातील नांदूर मधमेश्वर जलद कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतर्फे पाणी आवर्तनासाठी शुक्रवारी (ता. ३) वैजापूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सायंकाळपर्यंत मागणी मान्य न झाल्याने या मोर्चाचे रूपांतर उपोषणात करण्यात आले.

मोर्चेकऱ्यांच्या माहितीनुसार, दिवसभरात छत्रपती संभाजीनगर येथे बैठक सुरू असून निर्णय झाला की कळवतो असे उत्तर मोर्चेकऱ्यांना मिळत होते. परंतु दिवसभरात व सायंकाळपर्यंत निर्णय झाला नाही. आधार शेतकरी जलदूत समितीचे प्रमुख पंडित अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

शुक्रवारी सायंकाळपर्यंत मागण्यांविषयी निर्णय न झाल्याने शेतकरी वैजापूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयासमोर ठाण मांडून होते. दुष्काळी स्थितीत नियमाप्रमाणे नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून गंगापूर, वैजापूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडणे गरजेचे होते.

यासंदर्भात आधार शेतकरी जलदूत समितीतर्फे वेळोवेळी पाठपुरावा करूनही उन्हाळी पाणी आवर्तन सोडले नाही. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला. प्रचंड उन्हातही महिला व पुरुष शेतकरी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी वैजापूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयासमोर ठाण मांडून होते.

निर्णय न झाल्याने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आल्याची माहिती पंडित शिंदे यांनी दिली. शनिवारी (ता. ४) वाजेपर्यंतही मागणी मान्य न केल्याने उपोषण सुरूच होते. उपोषणात शिंदे यांच्यासह, सोन्याबापू शिरसाट, रामचंद्र पिल्दे, योगेश तारू, सचिन गायकवाड, मंदाताई न्हावले आदी सहभागी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT