Chandrabhaga River Agrowon
ॲग्रो विशेष

Chandrabhaga River Pollution : चंद्रभागा नदी तीरावर घाणीचे साम्राज्य

Environmental Issues : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र चंद्रभागेत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीमुळे नदीतील पाणी प्रदूषित झाले आहे. अशा घाण पाण्यातच भाविकांना नाइलाजास्तव स्नान करावे लागत आहे.

Team Agrowon

Solapur News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र चंद्रभागेत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीमुळे नदीतील पाणी प्रदूषित झाले आहे. अशा घाण पाण्यातच भाविकांना नाइलाजास्तव स्नान करावे लागत आहे. अशातच घाण पाण्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील या ऐरणीवर आला आहे.

वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाइतकेच चंद्रभागेच्या स्नानालाही महत्त्व आहे. हजारो भाविक येथील चंद्रभागेतील पाण्यात स्नान करून सावळ्या विठुरायाचे दर्शन घेतात. परंतु याच पवित्र चंद्रभागा नदीपात्रातील पाणी आता घाण झाले आहे. हे घाण पाणी भाविकांच्या आरोग्याला हानिकारक ठरण्याची शक्यता आहे.

सध्या मार्गशीर्ष महिना आणि नाताळ सुट्यांमुळे पंढरीत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. येथे येणारे भाविक चंद्रभागेत स्नान करतात. परंतु मागील काही दिवसांपासून चंद्रभागा नदीपात्राची दयनीय अवस्था झाली आहे. नदीपात्रात शिळे अन्न, कपडे, भंग पावलेल्या मूर्ती, फुटलेले देवाचे फोटो, दशक्रिया विधीसाठी वापरलेले कपडे याबरोबरच निर्माल्याचे मोठ मोठे ढिगारे साचले आहेत.

नदीपात्रात आणि पाण्यात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. दुर्गंधीयुक्त आणि घाण पाण्यातच भाविकांना नाइलाजास्तव स्नान करावे लागत आहे. त्यामुळे पंढरीत चंद्रभागा स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी कुंचबणा झाली आहे.

गटारीचे पाणी चंद्रभागेत

पंढरपूर शहरातील गटारीचे पाणी चंद्रभागा पात्रात सोडले जाते. हे घाण पाणी गोपाळपूर येथील ओढ्यातून विष्णुपद येथील नदीच्या बंधाऱ्यात सोडले जाते. त्यामुळे चंद्रभागेला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. आजही लाखो भाविक चंद्रभागेतील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. यामुळे भाविकांना विविध आजारांना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महर्षी वाल्मीक संघाचा इशारा

दरम्यान, चंद्रभागा स्वच्छतेविषयी महर्षी वाल्मीक संघाने आवाज उठवला आहे. संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी चंद्रभागेतील अस्वच्छतेचा मुद्दा सोशल मीडियातून समोर आणला आहे. येत्या दोन दिवसांत नदी स्वच्छता मोहीम हाती घ्यावी; अन्यथा नदीपात्रातील घाण संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यालयात टाकून आंदोलन केले जाईल, असा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

July Rainfall: जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

Stamp Act Amendment: विकास करार रद्द झाल्यास मुद्रांक शुल्काचा परतावा मिळणार नाही; दुरुस्ती विधेयक विधानसभेत सादर

Milk Rate: दूधदर ५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

Women Empowerment: महिलांना प्रत्यक्ष हक्क, सन्मान, अधिकार मिळावा

Kharif Sowing: देशात खरिपाच्या पेरण्यांत २३ टक्क्यांची घट

SCROLL FOR NEXT