Kesari Bailgada Sharyat Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Kesari Bailgada Sharyat: खेडमध्ये बैलगाडा शर्यत पडली पार; विजेत्यांना लाखोंची बक्षीसे

बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने सकाळपासूनच परिसरातील वातावरण अतिशय उत्साहाचे होते. बैलगाडा शर्यतीच्या अंतिम सामन्यासाठी लाखोंची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली.

Team Agrowon

Pune Bailgada : श्री शकुंबरवली बाबा, मुक्ताबाई माता आणि रोकडोबा महाराज उत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यातील चऱ्होली खुर्द (ता.खेड) येथे भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली. २७ ते ३१ मार्च दरम्यान या उत्सवाला प्रचंड गर्दी झाली. शुक्रवारी या उत्सवाची सांगता बैलगाडा शर्यतीने झाली.

सभापती श्री रामदासशेठ नामदेव ठाकुर पाटील यांच्या ५१ व्या वाढदिवसाचे त्यासाठी विशेष निमित्त ठरले. आमदार दिलीप आण्णा मोहिते यांचे विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले.

बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने सकाळपासूनच परिसरातील वातावरण अतिशय उत्साहाचे होते. बैलगाडा शर्यतीच्या अंतिम सामन्यासाठी लाखोंची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली.

अंतिम विजेत्यांना महेंद्रा थार आणि दोन न्यू हॉलंड ट्रॅक्टर देण्यात येणार आहे. तसेच २५ दुचाकी गाड्याही विजेत्यांसाठी बक्षीस म्हणून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यत अत्यंत चुरशीची झाली. मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी या उत्सवाला हजेरी लावली.

राज्यातील विविध भागातून या बैलगाडा शर्यतीसाठी शौकीनांनी हजेरी लावली. कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी स्पर्धा पाहिली, त्यानंतर महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली.

तर खेडमध्ये पंचायत समिती आणि बाजार समितीचे सभापती रामदास ठाकूर यांनी तर बैलगाड्यांची महाराष्ट्र केसरी शर्यत ठेवली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT