Agriculture News  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Scheme : शेतीमाल तारणकर्ज योजनेसाठी एक कोटी रुपये निधी

Agriculture Produce Mortgage Loan : परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती गत १३ वर्षांपासून स्वनिधीतून शेतीमाल तारणकर्ज योजना राबवीत आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती गत १३ वर्षांपासून स्वनिधीतून शेतीमाल तारणकर्ज योजना राबवीत आहे. चालू आर्थिक वर्षात शेतीमाल तारणकर्ज योजने अंतर्गत एक कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहणार आहोत, असे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांनी केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती घुले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. २९) पार पडली. बाजार समितीचे उपसभापती अजय चव्हाण, संचालक सर्वश्री गणेश घाटगे, संग्राम जामकर, गंगाप्रसाद आणेराव, पांडुरंग खिल्लारे, अरविंद देशमुख, रावसाहेब रेंगे, मुंजाजी जवंजाळ, रमेश देशमुख, फैजुल्ला खान पठाण, सचिव संजय तळणीकर आदी उपस्थित होते.

घुले म्हणाले, की परभणी बाजार समितीत मराठवाड्यात सर्व प्रथम कॉटन टेक्नॉलॉजी मिशन (टी. एम. सी.) योजनेअंतर्गत मार्केट यार्डात येणाऱ्या शेतीमालाची संगणकीय जाहीर लिलावाद्वारे विक्रीची व्यवस्था आहे. मुख्य बाजार आवारात धान्यचाळणी यंत्र कार्यान्वित केले आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, ज्वारी आदी शेतीमाल माफक दरात चाळणी करुन दिल्या जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बाजार भाव मिळत आहे.

पेडगाव येथील उपबाजार पेठेत धान्य चाळणी यंत्र, कोल्ड स्टोअरेज रायपनिंग चेंबरचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी ३० गाळे व १००० टन साठवणूक क्षमतेच्या गोदामाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. दैठणा येथील उपबाजार पेठेत १००० टन साठवणूक क्षमतेचा गोदाम उभारण्यात येणार आहे.

गतवर्षी सोयाबीन, तूर हरभरा या शेतीमालासाठी एकूण ६५ शेतकऱ्यांना ८६ लाख ५७ हजार रुपये तारण कर्जवाटप केले. सचिव तळणीकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त, लेखा परीक्षण केलेल्या लेख्यांचे तव्दतच जमा खर्च, वार्षिक प्रशासकीय अहवालातील मुद्यांबाबत संक्षिप्त माहिती दिली. सभेस बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, सरपंच, व्यापारी, हमाल प्रतिनिधी, बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT