Sugarcane Harvesting Season agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : गाळप सुरू होऊन पंधरवडा उलटला, पण ऊसदराबाबत कारखानदार गप्पच

Sugarcane FRP : यंदाचा गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरु झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३३ साखर कारखाने आहेत. त्यापैकी १२ साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळप सुरू केले आहे.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू होऊन, आता पंधरवडा उलटत आला, पण ऊसदराबाबत मात्र साखर कारखानदारांनी चुप्पी साधली आहे. कोणीच ऊसदराबाबत बोलायला तयार नाही. सर्वांबरोबर देऊ, हे एकमेव गुळगुळीत उत्तर कारखानदार देत आहेत. पण तो दर किती हे मात्र जाहीर केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

यंदाचा गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरु झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३३ साखर कारखाने आहेत. त्यापैकी १२ साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळप सुरू केले आहे. आतापर्यंत जवळपास १० लाख टनांच्या आसपास गाळप या कारखान्यातून झालेले आहे. पण कोणताच कारखाना दर जाहीर करायला तयार नाही.

केंद्र सरकारने साडेनऊ टक्के रिकव्हरी ग्राह्य धरुन ३४५० रुपये इतकी एफआरपी जाहीर केली आहे. पण कारखानदार मात्र ती वेळेत देणार का आणि त्यापेक्षाही जादाचा दर किती देणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जवळपास ६ साखर कारखानदार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर अन्य काहीजण अप्रत्यक्ष या कामात होते, त्यामुळे शेतकऱ्यांनीही त्याकडे फारसे लक्ष दिले नाही, पण विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आता पार पडली आहे. पण तरीही कारखानदार गप्पच आहेत.

कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे, आता १५ दिवसांचा कालावधीही उलटत आहे. कारखानदारांना १५ दिवसांच्या आत एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यानुसार ते देतील, आम्ही लक्ष ठेवून आहोत.
-पांडुरंग साठे, सहसंचालक, (साखर), सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस, गारपिटीचा इशारा

Agri Irrigation Subsidy: ठिबकचे २३५ कोटी मार्चअखेर मिळणार

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

SCROLL FOR NEXT