Agricultural Pump  Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Pump Theft : कळवणमध्ये कृषिपंप चोरट्यांचा धुमाकूळ

Agriculture Theft Update : तालुक्यातील पूर्व भागातील गिरणा नदीकाठावरील विहिरीवरील कृषिपंप, केबल चोरट्यांकडून वारंवार चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची भीती पसरली असून, मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Team Agrowon

Kalvan News : तालुक्यातील पूर्व भागातील गिरणा नदीकाठावरील विहिरीवरील कृषिपंप, केबल चोरट्यांकडून वारंवार चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची भीती पसरली असून, मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तालुक्यात सतत होत असलेल्या कृषी साहित्याच्या चोरीमुळे सराईत गुन्हेगारांची ही टोळीच सक्रिय असून, ही टोळी पकडण्याचे मोठे आव्हान कळवण पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

कळवण तालुक्याचा पूर्व भागातून व गिरणाकाठ परिसरात तब्बल पंधरा वर्षांपासून हे सत्र सुरू असून दोन ते तीन महिन्यांतून गाव बदलून कृषिपंप, केबल, पशुधन चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील भादवण येथील गिरणा काठ परिसरातील विहिरीवरील तब्बल चाळीस ते पन्नास शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची केबल चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी मोहन बाजीराव जाधव यांनी कळवण पोलिसात तक्रार दाखल करून अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एक महिन्यापूर्वी जबरी चोरी

भादवण गिरणा काठ परिसरातून महिनाभरापूर्वी चोवीस शेतकऱ्यांच्या विहिरीवरील केवल एकाच रात्री चोरीला गेल्या होत्या. शेतकऱ्यांनी याबाबत कळवण पोलिसात तक्रार केली होती. कळवण पोलिस विभागाकडून नदीकाठच्या काटवन परिसराची पाहणी करून या परिसरात रात्री गस्तदेखील वाढवण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये पिळकोस, बेज, गांगवण येथील नदीकाठ शिवारात विहिरी असलेल्या शेकडो शेतकऱ्यांचे कृषिपंप व केबल चोरीला गेले होते. त्यावेळीही पिळकोस, भादवन, जुनी बेज येथील शेतकऱ्यांनी कळवण पोलिसात लेखी तक्रार दिली होती. कृषिपंप चोरीला जात असल्याने शेतकरी धास्तावला आहे.

दोन वेळा चोरी झालेले शेतकरी

भाऊसाहेब जाधव, मोहन जाधव, सोपान जाधव, नीलेश जाधव, संदीप जाधव, देवाजी जाधव, वामन जाधव, रणजित जाधव, दर्शन जाधव, व्यंकट जाधव, त्रंबक जाधव, अशोक जाधव, नंदू जाधव, पृथ्वीराज जाधव, किरण जाधव, योगेश जाधव, गंगाधर जाधव, रामकृष्ण जाधव, रमेश जाधव, शिवाजी जाधव, पंढरीनाथ जाधव, शांताराम जाधव, रोशन जाधव, राहुल जाधव, राकेश जाधव आदी.

रात्रीतून कृषी साहित्य, पशुधन चोरीला जाण्याच्या घटना वाढत असून पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा.
नीलेश जाधव, नुकसानग्रस्त शेतकरी, भादवण
गेल्या काही दिवसांपासून कळवण पोलिस विभागाकडे कृषिपंप, केबल, पशुधन, शेती साहित्य चोरीला जात असल्याच्या तक्रारी येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार पूर्व पट्ट्यात रात्रीची गस्त वाढवली आहे. गिरणा काठचा परिसर काटवनचा असून प्रचंड दाट झाडी आहे. त्याचा फायदा चोरटे घेतात. लवकर चोरट्यांना पकडू.
विठ्ठल बागूल, सहायक पोलिस उपनिरीक्षक, कळवण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT