Shingada  Agrowon
ॲग्रो विशेष

Chestnut Crop : धानपट्ट्यात बहरतोय शिंगाडा

Paddy Crop : धानपट्ट्यात शिंगाडा हे पीक फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांद्वारे धान बांधीत शिंगाडा लागवडीवर भर दिला जात आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Chandrapur : धानपट्ट्यात शिंगाडा हे पीक फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांद्वारे धान बांधीत शिंगाडा लागवडीवर भर दिला जात आहे. शिंगाडा पिकाला शेतकऱ्यांचा मिळणारा वाढता प्रतिसाद बघता आत्मा योजनेतूनही याला प्रोत्साहन देत चार हजार रुपयांच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

शिंगाडा हे औषधी गुणधर्मयुक्‍त खाद्यान्न मानले जाते. त्यामुळेच त्याला खवय्यांची देखील मागणी राहते. गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांत माजी मालगुजारी तलावात हे वेलवर्गीय पीक घेतले जाते. याला बाजारपेठ देखील उपलब्ध आहे. यातून चांगला पैसा होत असल्याने काही शेतकरी आता थेट धान बांधीत पाणी साठवून या पिकाच्या लागवडीवर भर देत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागात धान (भात) लागवड होते. याच धानपट्ट्यापैकी नागभीड तसेच ब्रह्मपुरी तालुक्‍यात गेल्या काही वर्षात शेतकरी खरिपात धानाऐवजी शिंगाडा लागवडीसाठी पुढे आले आहेत. धान बांधीमध्ये पाणी साठवत याच्या वेली लावल्या जातात. याचा उत्पादकता खर्चही कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची पसंती या पिकाला मिळत आहे.

नागभीड आणि ब्रह्मपुरी तालुक्‍यात आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जितेंद्र कावळे, अमित हातझाडे यांच्या माध्यमातून शिंगाडा लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. नागभीड तालुक्‍यातील नवेगाव पांडव, नवखळा या गावांमध्ये दहा शेतकऱ्यांद्वारे शिंगाडा लागवड करण्यात आली आहे.

शिंगाडा लागवडीसाठी एक एकराचे एक याप्रमाणे प्रत्येक तालुक्‍यात दहा प्रात्यक्षिक देण्यात आली आहेत. एका प्रात्यक्षिकासाठी चार हजार रुपयांचे अनुदान थेट हस्तांतरण प्रक्रियेच्या माध्यमातून खात्यात वर्ग होते.

वेल वाढविण्यासाठी काही शेतकरी खत देतात तर काही नैसर्गिक पद्धतीने शिंगाडा उत्पादन घेतात. या वर्षी केवळ दहा एकरावर प्रात्याक्षिक असले तरी शेतकऱ्यांचा याला मिळालेला प्रतिसाद बघता या क्षेत्रात पुढील वर्षी वाढीचा प्रस्ताव आहे, असे आत्मा प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर यांनी सांगीतले.

गडचिरोली, गोंदिया, साकोली या भागांतून लागवडकामी वेल आणली जाते. प्रती वेल आठ रुपये असा दर आहे. जुलै अखेर याची लागवड होते. शिंगाडा हे चार महिन्याचे पीक आहे. एका एकरातून सरासरी ३० क्‍विंटलचे उत्पादन होते. ग्राहकांना याची थेट विक्री केली जाते. सध्या विक्री दर ४० रुपये किलो असा आहे. त्यामुळे चांगले पैसे होतात. त्याच्याच परिणामी शेतकरी आता धानाऐवजी शिंगाडा घेत असल्याचे चित्र आहे.
- प्रिती हिरळकर, प्रकल्प संचालक, आत्मा, चंद्रपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT