Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना भरपाईपोटी ९८७ कोटींची मदत

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यात ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाईपोटी शासनाने नुकताच निर्णय घेऊन मदत वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बीड, लातूर, परभणी या तीन जिल्ह्यांच्या वाटेवर ९८७ कोटी ५८ लाख ३३ हजारांची मदत आली आहे.

मराठवाड्यात ऑगस्ट, सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी, पुर यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले होते.

त्यानुसार ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पुर यामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण ९९७ कोटी ४ लाख ३६ हजार रुपये निधी वितरणास शासनाने मंजुरी दिली होती.

जिल्हानिहाय मदत अशी...

यामध्ये ऑगस्टमध्ये मराठवाड्यात बीड, लातूर व परभणी या तीन जिल्ह्यांत नुकसान झालेल्या ४ लाख ४२ हजार ४४७ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी नुकसानग्रस्त ६ लाख ९ हजार ५७९ शेतकऱ्यांना ६०३ कोटी ४३ लाख ९५ हजार रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

यामध्ये ऑगस्टमध्ये बीड जिल्ह्यात नुकसान झालेल्या ७९ हजार ४९२ शेतकऱ्यांच्या ४० हजार १६९ हेक्टर क्षेत्रासाठी ५४ कोटी ६२ लाख ९८ हजार, लातूर जिल्ह्यातील ३२६ शेतकऱ्यांच्या १५५ हेक्टरसाठी २१ लाख ८ हजार तसेच सप्टेंबरमध्ये नुकसान झालेल्या परभणी जिल्ह्यातील ५ लाख २९ हजार ७६१ शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या ४ लाख २ हजार १२३ हेक्टर क्षेत्रासाठी ५४८ कोटी ५९ लाख ८९ हजार रुपये वितरित करायचा मदतीचा समावेश आहे.

याशिवाय सप्टेंबरमध्ये लातूर जिल्ह्यातील नुकसान झालेल्या ३ लाख ५८ हजार ७६७ शेतकऱ्यांच्या २ लाख ८२ हजार ४५८ हेक्टर क्षेत्रासाठी ३८४ कोटी १४ लाख ३८ हजार रुपये वितरित करण्याच्या शासन निर्णयाचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT