Cotton Seed Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Bogus Seed : चोपड्यात कापूस बनावट बियाण्याची ९५ पाकिटे जप्त

Cotton Seed Update : चोपडा (जि. जळगाव) येथील एका हॉटेलात बनावट कापूस बियाण्याची ९५ पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.

Team Agrowon

Jalgaon Cotton News : चोपडा (जि. जळगाव) येथील एका हॉटेलात बनावट कापूस बियाण्याची ९५ पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी एका शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी संदीप आधार पाटील (रा. वर्डी, ता. चोपडा) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

संकरित देशी कापूस बियाण्याची ९९ हजार ७५० रुपये किमतीची ९५ सीलबंद पाकिटे आढळून आली आहेत. गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत संदीप पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी यंत्रणांना चोपडा-धरणगाव रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलात बनावट कापूस बियाणे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या मदतीने हॉटेलमध्ये जाऊन चौकशी केली असता, वर्डी येथील संदीप आधार पाटील यांनी गाडी खराब झाली म्हणून दोन प्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवल्याची माहिती हॉटेलचे व्यवस्थापक यांनी दिली.

पिशव्यांची तपासणी केली असता त्यात बनावट अंकुर देशी कापूस बियाणे सापडले. शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी परवानाधारक बियाणे विक्री केंद्रातूनच पक्क्या बिलासह परवानाधारक उत्पादक कंपनीचे बियाणे खरेदी करावे, असे आवाहन नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी नाशिक विभागातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.

संशयित संदीप याला चोपडा शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक यांनी ताब्यात घेतले असून, वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते.

बोगस बियाण्याच्या रॅकेटमध्ये कोण कोण आरोपी आहेत, त्यांचा शोध घेण्यात येईल, असे तपास अधिकारी संतोष चव्हाण यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Pests: टोमॅटो पिकातील रस शोषक किडींना घाला आळा

Nashik Drought : नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लासलगाव येथील बैठकीत ठराव

Tanker Water Supply: मागेल त्याला टँकरने पाणी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Irrigation Water Rates: उपसा सिंचनच्या पाणीवापराचे दर निश्चित; कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांची माहिती

Maharashtra Cabinet Decisions: दुष्काळ निवारणासाठी सरकारचे मोठे पाऊल, कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंधही रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत ५ महत्त्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT