Mango Season Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Orchard : निर्यातक्षम ५३९ आंबा बागांची नोंदणी

Mango Export : युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते.

Team Agrowon

Solapur News : युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात ९ हजार ४५९ तर सोलापूर जिल्ह्यातून ५३९ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे.

निर्यातक्षम आंबा फळबागेत राबवायच्या योग्य कृषी पध्दती राबविणे आवश्यक आहे. युरोपीय युनियन व अमेरिकेला आंबा निर्यात करण्यासाठी क्षेत्रीय / शेतकरी स्तरावर ठेवायचे दस्तऐवजचे विहित प्रपत्रात जतन करावे.

याबाबतच्या सूचना आयुक्तालयाने दिल्या आहेत. निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात (प्रपत्र १) अर्ज दाखल करावा. त्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांमार्फत क्षेत्राची तपासणी करून प्रपत्र ४ अ मध्ये अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना सादर केला जातो.

त्यानंतर प्रपत्र २ व प्रपत्रात नोंदणी प्रमाणपत्र अदा केले जाते. शेतकऱ्यांनी पीक संरक्षणाच्या दृष्टीने शेतात राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या बाबींच्या नोंदी प्रपत्र क मध्ये नोंदी वेळेत घेणे आवश्यक आहे.

अधिक माहितीकरिता तालुका कृषी कार्यालय किंवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधून विहित मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market: कांद्याला समांतर बाजारभाव योजना लागू करण्याची मागणी

Cotton Farmers Seminar: कापूस संशोधन विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी पीक परिसंवाद

Israel Iran conflict: इस्रायलचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला; इराणमध्ये आणीबाणी, मध्यपूर्वेतील तणाव तीव्र

Washim Development: समन्वय, नियोजनातून प्रगती

Ayushman Bharat Yojana: रुग्णालयांत उपचारांचे दरपत्रक लावावे लागणार

SCROLL FOR NEXT