Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : जळगाव जिल्ह्यात पावसाने ९०५ हेक्टरवर नुकसान

Unseasonal Rain : अवकाळी पाऊस, गारपिटीने एकूण १०६ गावांतील शेतकऱ्यांचे कापूस, कांदा, केळी, हरभरा, गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात रविवारी (ता. २६) व सोमवारी (ता. २७) झालेल्या गारपीट अन् अवकाळी पावसाने खरिपासह रब्बी पिकांचे एकूण ९०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासंबंधीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. या नुकसानीच्या यादीत कापसाचा कुठेही समावेश नाही.

जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने एकूण १०६ गावांतील शेतकऱ्यांचे कापूस, कांदा, केळी, हरभरा, गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात जामनेरमधील ९९, भुसावळमधील १९४, बोदवडमधील १००.३५, चाळीसगावमधीस ४४६, एरंडोलमधील ५, भडगावमधील १५४, पाचोरामधील ७ हेक्टरचा समावेश आहे.

दरम्यान, अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. रब्बी पिकांच्या पेरण्यांना आता वेग येणार आहे. आतापर्यंत रब्बीची २५ टक्के पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रब्बी हंगामातील कमाल पिकांना पावसाचा आधार होणार आहे. परंतु शेतात वेचणीवर आलेला कापूस भिजून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती या अहवालात समाविष्ट केलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कापूस पीक सुमारे आठ महिन्यांचे आहे. परंतु हे पीक खरिपातील असल्याचा मुद्दा पंचनामे करताना पुढे करण्यात आला व कापूस नुकसानीची माहिती कुठेही समाविष्ट करण्यात आलेली नाही. यामुळे कापूस उत्पादकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे.

विमा योजनेतूनही नाही मदत

कापसासाठी खरिपात अनेकांनी विमा संरक्षण घेतले. परंतु हे विमा संरक्षण फक्त चार महिन्यासाठी होते. हा विमा संरक्षण कालावधी संपल्याने शेतकऱ्यांच्या कापूस नुकसानीची माहिती किंवा तक्रार दखलपात्र नाही. या स्थितीत शासनाने कापूस उत्पादकांना मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT