Agriculture Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Subsidy : परभणीतील प्रोत्साहनपर अनुदानाचा ९ हजारांवर शेतकऱ्यांना लाभ

जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती मार्फत ९२ तक्रारीचे निराकरण करण्यात आले अजून २५ तक्रारी प्रलंबित होत्या.

Team Agrowon

Parbhani News : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Mahatma Jotirao Phule Farmer Scheme) -२०१९ अंतर्गत शुक्रवार (ता.१०) पर्यंत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानास पात्र परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) ९ हजार १८ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर २८ कोटी १ लाख रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५० हजार रुपये पर्यत दिला जात आहे.

या तीन वर्षांपकी शेवटच्या वर्षात कर्ज घेतलेले आहे. त्या वर्षाच्या कर्जाची मुद्दल रक्कम विचारात घेतली जात आहे.

या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ४१ हजार ४८८ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. विशिष्ट क्रमांकासह पहिली आणि दुसऱ्या मिळून एकूण ११ हजार ९५ शेतकऱ्यांची प्रसिद्ध झाली.

त्यापैकी १० हजार ७२३ शेतकऱ्यांनी आधारप्रमाणिकरण करून घेतले तर ३७२ खात्याचे आधारप्रमाणिकरण शिल्लक आहे. एकूण १६९ कर्जखात्याबाबत तक्रारी आहेत.

जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती मार्फत ९२ तक्रारीचे निराकरण करण्यात आले अजून २५ तक्रारी प्रलंबित होत्या. तालुकास्तरावर प्राप्त ४६ पैकी ७ तक्रारी प्रलंबित आहेत. ९ हजार १८ शेतकऱ्यांच्या खात्यावर २८ कोटी १ लाख रुपये अनुदान जमा करण्यात आले.

या योजनेअंतर्गत अनुदानास पात्र शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे.त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास विलंब लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT