Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ८६.७२ कोटी मंजूर

Crop Damage Update : अकोला जिल्ह्यात गेल्या वर्षात सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचे सरकारने जाहीर केले होते.

Team Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्यात गेल्या वर्षात सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचे सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यात नुकसानग्रस्त एक लाख ३३ हजार ६५६ शेतकऱ्यांसाठी शासनाने ८६ कोटी ७२ लाख ७० हजारांचा निधी मंजूर केला आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना धोका दिला. सलग आठ दिवस झालेल्या पावसाने पीक वाया गेले. काही भागांत जोरदार पाऊस झाल्याने सर्वच खरीप पिकांचे नुकसान झाले.

शासनाने बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याची घोषणा केली व तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले. याव्यतिरिक्त सततच्या पावसासह अतिवृष्टीमुळे जून, जुलै महिन्यात शेतकऱ्यांचे १२३ कोटी ६२ लाख, तर ऑगस्टमध्ये १० कोटी ४१ लाखांचे अर्थात दोन महिन्यात १३४ कोटी ४० लाख ४१ हजार ८६४ रुपयांचे नुकसान झाले.

त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे ४२७ गावातील एक लाख १० हजार १६३ शेतकऱ्यांचे ८३ हजार १३३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यासाठी ११३ कोटी ६१ लाख ७०४ रुपयांच्या मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती.

तसेच, खरीप हंगामात झालेल्या सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी सुद्‍धा शासनाकडे करण्यात आली होती. त्यामुळे नुकसान ग्रस्तांसाठी शासनाने मदत जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ८६ कोटी ७२ लाख ७० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

...अशी राहील मदत

-बाधित शेतकरी - १ लाख ३३ हजार ६५६

-बाधित क्षेत्र - ९१ हजार ८४५.९९ हेक्टर

-मंजूर निधी - ८६ कोटी ७२ लाख ७० हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizers Crisis: खतबाजारात खदखद

Strait of Hormuz Crisis: ‘होर्मूझ’मधील पाणसुरुंग हटविण्यास सहा महिने लागण्याची शक्यता

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार ‘जैसे थे’

Maharashtra Weather Forecast: उन्हाचा चटका वाढणार; पावसाचीही शक्यता

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

SCROLL FOR NEXT