ॲग्रो विशेष

Water Supply Scheme : वाढीव पाणीपुरवठ्यासाठी ८६५ कोटींची निविदा मंजूर

Amrut-2 Yojana : अमरावती शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना अमृत-दोनसाठी ८६५.२६ कोटी रुपयांच्या निविदेस शासनाच्या तांत्रिक समितीने मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Amaravati News : अमरावती शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना अमृत-दोनसाठी ८६५.२६ कोटी रुपयांच्या निविदेस शासनाच्या तांत्रिक समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे शहराला २०५५ पर्यंतच्या लोकसंख्येसाठी मुबलक व नियमित पाणीपुरवठ्याचा मार्ग सुकर झाला आहे.

सिंभोरा धरण ते नेरपिंगळाई या डब्ल्यूटीपी वितरिकेचे आयुष्य संपुष्टात आले असून ती शिकस्त झाल्याने वारंवार पाणीपुरवठा खंडित होतो. त्याचप्रमाणे अमरावती शहराचे २०५५ पर्यंतचे लोकसंख्या वाढीचे लक्ष्य समोर ठेवत अमृत-दोन ही वाढीव पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली होती. केंद्र सरकारची अमृत-दोन ही योजना अमरावती शहराला मिळावी, यासाठी आमदार सुलभा खोडके यांनी विशेष प्रयत्न केले.

मजीप्राकडून त्यासाठी ८६५.२६ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून घेत मंजुरीसाठी पुरवठा सुरू ठेवला. ५ जुलै २०२३ रोजी राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ९८५.४९ कोटींच्या अमृत-दोन अमरावती वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत केंद्र शासन ३२८.४८ कोटी इतका भार उचलेल व उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून खर्च करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आणणार आहे, असा निर्णय घेऊन केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली.

त्यानंतर केंद्र सरकारच्या शिखर समितीची मान्यता मिळाल्याने निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. निविदा प्रक्रियेच्या हालचाली सुरू असताना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी या योजनेचा आढावा घेत निविदा मंजूर केली. तसेच नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे शिफारस केली.

या शिफारशीच्या अनुषंगाने राज्यस्तरीय तांत्रिक समितीचे अध्यक्ष गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत योजनेच्या अमृत-दोन अमरावती वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी ८६५.२६ कोटी रुपयांच्या निविदेस मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यामुळे अमरावती शहराचा नियमित पाणीपुरवठ्याचा मार्ग सुकर झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला प्रस्ताव मार्गी लावता आला, याचे समाधान आहे. त्यासाठी स्थानिक पातळीपासून राज्य व केंद्र सरकारपर्यंत पाठपुरावा केला. अमरावतीकरांची जिव्हाळ्याची व अत्यंत गरजेची निकड सोडवता आली.
-सुलभा खोडके, आमदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT