Sugarcane Variety agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Variety : '८६०३२' उसाच्या वाणाला आता पर्याय '१५०१२', उत्पादन होणार डबल

Sugarcane Production : सध्या बाजारात '८६०३२' वाणाला '१५०१२' वाण पर्याय म्हणून हे नवीन वाण गेल्यावर्षी प्रसारित झाले आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Sugarcane Production : महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. यामुळे वसंतदादा शुगर इंडस्ट्रीजबरोबर राज्यातील अनेक संस्था उसाच्या वेगवेगळ्या जातींची निर्मीती करत असतात.

दरम्यान सध्या बाजारात '८६०३२' वाणाला '१५०१२' वाण पर्याय म्हणून हे नवीन वाण गेल्यावर्षी प्रसारित झाले आहे. उत्पादनासह याची रिकव्हरीही चांगली असल्याने शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

नवीन फुले ऊस १५०१२ (एमएस १७०८२) या मध्यम पक्वतेच्या वाणाची निर्मिती फुले २६५ आणि को ९४००८ या वाणांच्या संकरातून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव या ठिकाणी केली आहे. प्रथम संकर २०१२ मध्ये केला होता, २०१३ आणि २०१४ मध्ये रोप निर्मिती आणि रोपातून निवड केली. त्यानंतर २०१४ पासून २०२१ पर्यंत स्थानिक, बहुस्थानीय चाचण्या तीनही लागवड हंगामात लागवड ऊस आणि खोडवा पिकाच्या घेतल्या.

दरम्यान या उसाच्या वाणाचा नऊ राज्यात अभ्यास केला. अहवालाच्या आधारे डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठात संयुक्त कृषी संशोधन विकास समितीच्या बैठकीत फुले ऊस १५०१२ या वाणाची पूर्वहंगामी आणि आडसाली हंगामात पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केली आहे.

दरम्यान याबाबत कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख जयवंत जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, '८६०३२' वाणाला '१५०१२' वाण पर्याय होऊ शकतो. हे नवीन वाण गेल्यावर्षी प्रसारित झाले. जिल्ह्यात ५०० शेतकऱ्यांकडे बियाणे असणार आहे. याचबरोबर ऊस संशोधन केंद्र कृषी विद्यालय बावडा येथे नोव्हेंबरपासून हे बियाणे विक्री असणार आहे तर शेतातील पाण्याची परिस्थिती पाहून उसाची लागण करण्याचे आवाहन जगताप यांनी केले.

फुले ऊस १५०१२ हा मध्यम पक्वतेच्या वाणाचे को ८६०३२ वाणापेक्षा १६ टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन आणि साखर १५.५१ टक्के अधिक मिळाले. फुले २६५ वाणा तीनही आणि खोडव्याच्या सरासरीची तुलना केली असता उ उत्पादन तोड मिळाले. साखर उत्पादनात ६ टक्के वाढ दिसून आली.

उसातील व्यापारी शर्करा प्रमाण हे को ८६०३२ पेक्षा ०.४ युनिट आणि फुले २६५ पेक्षा ०.८ युनिटने जास्त असल्याने | साखर उत्पादन वाढीसाठी हे वाण चांगला आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी कारखाने बियाणे प्लॉट करत. आता फक्त काही कारखाने सोडले तर बहुतांश कारखाने बियाणे प्लॉट करत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT