Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Farming : शेतकऱ्यांच्या घरात ८५ टक्के कापूस

Cotton Market : जवळपास १५ टक्के कापूसच बाजारात आला आहे. तब्बल ८५ टक्के कापूस शेतकऱ्यांनीच साठा करून ठेवला आहे. त्याचा परिणाम जिनिंग व्यवसायावर देखील झाला आहे.

Team Agrowon

Yavatmal News : यंदा कापसाच्या भावात स्थिरता दिसत नाही. दरात चढ-उतारच जास्त दिसत आहे. कापसाचे दर खाली आले आहेत. परिणामी अजूनही जवळपास १५ टक्के कापूसच बाजारात आला आहे. तब्बल ८५ टक्के कापूस शेतकऱ्यांनीच साठा करून ठेवला आहे. त्याचा परिणाम जिनिंग व्यवसायावर देखील झाला आहे. एकाच शिफ्टमध्ये उद्योग सुरू ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

कापसाच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. त्याचा परिणाम कापूस खरेदी-विक्रीवर दिसून येत आहे. दरात झालेली घट पाहता कापूस शेतकऱ्यांच्या घरातच आहे. गेल्या काही महिन्यांपासून कापसाचे दर आठ हजारांच्या पुढे सरकलेले नाहीत.

यंदा कापसाला दहा हजार रुपयांच्यावर दर मिळतील, अशीच चर्चा होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही कापूस विक्रीकरिता बाजारात आणलेला नाही. आतापर्यंत १५ टक्के कापसाचीच बाजारात उलाढाल झाली आहे. अजूनही जवळपास ८५ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरातच आहे. दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अजूनही कापूस विक्रीसाठी बाहेर काढलेला नाही.

कापसाला ७ हजार २०० रुपये दर मिळत होते. त्यात घसरण सुरूच आहे. सध्या कापसाचे दर ६ हजार ५०० ते ६ हजार ८०० रुपयांवर आले आहेत. कापसाचे दर सातत्याने घसरत असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. गेल्यावर्षी हे दर दहा हजारांवर गेले होते. यंदा मात्र, स्थिती बिकट आली आहे.

गरजेपुरतीच कापसाची विक्री: दर घसरल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. दर वाढतील, या अपेक्षेने शेतकरी कापूस विकायला तयार नाहीत. अडी-अडचणीला क्विंटल, दोन क्विंटल कापूस विकून शेतकरी आपली गरज भागवीत आहेत. दर वाढल्यास नुकसान होऊ नये, म्हणून यंदा शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. त्याचा परिणाम बाजारावर झाला आहे.

दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. गेल्या हंगामात देखील अशीच स्थिती होती. अद्यापही गेल्या हंगामातील कापसाची विक्री शेतकऱ्यांनी केलेली नाही. त्याचा फटका जिनिंग व्यवसायाला बसला असून दोन पैकी एकाच शिफ्टमध्ये उद्योग सुरू ठेवण्याची वेळ आली आहे.
अशोक निलावार, संचालक, बालाजी जिनिंग, आरणी, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT