Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : आंबा, काजू विम्याचा ८१ कोटींचा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Mango Cashew Crop Insurance : विमा कंपनीने तांत्रिकी दोष दूर करीत आतापर्यंत जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या खात्यात ८१ कोटी १० लाखांचा परतावा जमा केला आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : विमा कंपनीने तांत्रिकी दोष दूर करीत आतापर्यंत जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या खात्यात ८१ कोटी १० लाखांचा परतावा जमा केला आहे. दोडामार्ग तालुक्यातील चार मंडलांतील शेतकरी परताव्याचा प्रतीक्षेत असून त्यांना साधारणपणे २ कोटींचा परतावा मिळणे अपेक्षित आहे.

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील २७ हजार ६१७ आंबा बागायतदार तर १० हजार ७४३ काजू बागायतदार अशा एकूण ३८ हजार ३६९ बागायतदारांनी ११ कोटी रुपयांचा शेतकरी हिस्सा विमा कंपनीला भरून आपले क्षेत्र संरक्षित केले होते. यावर्षी सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, वाढलेले तापमान यामुळे आंबा, काजूचे नुकसान झाले.

कृषी अधीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार २६ हजार ९९२ आंबा बागायतदार तर ८ हजार ४७१ काजू बागायतदार विमा परताव्यास पात्र ठरले. आंबा बागायतदारांना ७३ कोटी ५ लाख तर काजू नुकसानीपोटी १० कोटी ५ लाख असा एकूण ८३ कोटी १० लाख रुपये परतावा मिळणे अपेक्षित आहे.

विमा परतावा वेळेत न मिळाल्यामुळे आंबा, काजू बागायतदार संघासह विविध राजकीय पक्षांनी कृषी विभाग, विमा कंपनीविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारादेखील दिला होता. परंतु नव्याने सुरू केलेल्या १८ हवामान केंद्रांवर स्वंयचलित यंत्रे नसल्यामुळे पेच निर्माण झाला होता.

त्यामुळे विमा परताव्यास विलंब झाला होता. दरम्यान १० नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील काही मोजक्या मंडलांतील शेतकऱ्यांच्या खात्यात परताव्याची रक्कम झाली. परंतु निम्म्यापेक्षा अधिक मंडले वंचित होती. मात्र त्यानंतर विमा कंपनीने तांत्रिक दोष दूर करीत विमा परतावा देण्यास सुरुवात केली.

आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ८१ कोटींचा विमा परतावा जमा झाला आहे. आता फक्त दोडामार्ग तालुक्यातील चार मंडले विम्यापासून वंचित आहेत. याशिवाय सावंतवाडीतील माडखोल मंडलाचा विषय प्रलंबित आहे. साधारणपणे २ कोटींचा परतावा मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT